'Animal' song Jamal Kudu out: Esakal
मनोरंजन

Animal: 'अ‍ॅनिमल' मधील बॉबी देओल उर्फ ​​'अबरार'चं एन्ट्री साँग अखेर प्रेक्षकांच्या भेटीला! रिलिज होताच झालं व्हायरल

सध्या मनोरंजन विश्वात फक्त एकाच सिनेमाची खुप चर्चा आहे. तो म्हणजे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल'.

Vaishali Patil

'Animal' song Jamal Kudu out: सध्या मनोरंजन विश्वात फक्त एकाच सिनेमाची खुप चर्चा आहे. तो म्हणजे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल'. रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे.

दिवसेंदिवस या चित्रपटाची कमाई वाढत आहे. वीकेंडनंतरही चित्रपटाच्या कमाईत कमी झालेली नाही. या चित्रपटाची कथा, अॅक्शन आणि चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खुप आवडत आहे.

चित्रपटातील अनेक सीन्स सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. मात्र त्यात सर्वात जास्त व्हायरल होत आहे ते गाणं म्हणजे 'जमाल कुडु'. चित्रपटात बॉबी देओलच्या एंट्रीदरम्यान वाजणारा हाच ट्रॅक वाजवला गेला आहे.

बॉबी देखील या गाण्यावर नाचताना दिसतो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता हे गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या गाण्याचे नावही 'अबरार्स एन्ट्री साँग जमाल कुडू'. हे गाणे रिलीज होताच व्हायरल झाले आहे. लोकांना हे गाणे खूप आवडत आहे. इतर गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या पारंपारिक इराणी गाण्याला शबिना, अभिक्य, ऐश्वर्या दासरी आणि मेघना नायडू यांनी आपला आवाज दिला आहे.

सध्या सोशल मिडियावर 'जमाल कुडू' या गाण्याचे लाखो रील व्हायरल होत आहेत. हे गाणे रिलिज करण्यात यावे अशी मागणी नेटिझन्स करत होते.

बॉबी देओलने देखील हे गाणे त्याच्या सोशल मिडियावर शेयर केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'या गाण्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही मागितले आणि आम्ही तुमची विनंती ऐकली. अशा प्रकारे आज आम्ही हे गाणे रिलीज करत होत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. 'अ‍ॅनिमल' 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT