Animal Movie controversy in Parliament House! inc mp ranjeet ranjan slam animal  SAKAL
मनोरंजन

Animal Movie: 'अ‍ॅनिमल'चा वाद संसद भवनात! महिला खासदार तक्रार करत म्हणाली, "माझी मुलगी..."

'अ‍ॅनिमल' सिनेमाचा वाद संसद भवनात पोहोचला असुन महिला खासदाराने तक्रार मांडली आहे

Devendra Jadhav

Animal Movie Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. विविध स्तरांवरुन 'अ‍ॅनिमल'बद्दल चांगल्या - वाईट प्रतिक्रिया येत आहेत. अशातच 'अ‍ॅनिमल'चा वाद थेट संसदेत पोहोचलाय.

'अ‍ॅनिमल' पाहून छत्तीसगडच्या कॉंग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी संसदेत तक्रार मांडलीय. त्यामुळे 'अ‍ॅनिमल'चा वाद चांगलाच पेटणार असं दिसतंय.

माझी मुलगी सिनेमा अर्धाच सोडून बाहेर आली आणि...

खासदार रंजीत रंजन म्हणाल्या- "सिनेमा हा समाजाचा आरसा आहे. सिनेमांचा तरुणाईवर खूप प्रभाव आहे. आजकाल 'कबीर सिंग'पासून 'पुष्पा' आणि आता 'अ‍ॅनिमल' अशा सिनेमांचा तरुणाईवर प्रभाव आहे. कॉलेजमध्ये माझ्या मुलीसोबत इतरही मुली शिकतात. माझी मुलगी सेकंड इयरला आहे. 'अ‍ॅनिमल' पाहताना ती सिनेमा अर्धाच सोडून उठली आणि रडायला लागली."

युथ वर्गासमोर चुकीचा आदर्श

रंजीत रंजन पुढे म्हणाल्या, " सिनेमात शेवटी इतका हिंसाचार आणि महिलांची छेडछाड दाखवण्यात आली आहे. मला अशा गोष्टी सिनेमात दाखवणे योग्य वाटत नाही. अशी हिंसाचार करणारी नकारात्मक दृश्य 11वी-12वीतल्या मुलांसमोर मांडल्या जात आहेत. या मुलांनी अशा पात्रांना आदर्श मानायला सुरुवात केली आहे. सिनेमात अशा घटना दाखवल्या गेल्याने समाजात सुद्धा हिंसेचे स्वरुप वाढत आहे."

"पंजाबचा इतिहास उच्च दर्जाचा आहे. हरिसिंह नलवा यांच्या आयुष्याशी संबंधित सिनेमात एक गाणे आहे. पंजाबमधील समृद्ध इतिहासाला सिनेमात एका गॅंगवॉरशी जोडण्यात आलंय. सिनेमातला नायक ज्या पद्धतीने मोठ्या शस्त्रांनी सर्वांना मारतो ते वाईट दिसते. कोणताही कायदा त्याला शिक्षाही देत ​​नाही, हे सर्व चुकीचे आहे."

चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला इतिहास

रंजीत रंजन शेवटी म्हणतात, "सिनेमातलं अर्जन वैली हे गाणं हरिसिंग नलवा, जे शीख फोर्सचे कमांडर इन चीफ होते त्याच्या आयुष्यावर आधारित आहे. हरिसिंगने मुघलांविरुद्ध, इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. त्यांचा मुलगा अर्जनसिंग नलवा होता. 1947 मध्ये त्यांनी भारत - पाकिस्तान फाळणीवेळी अनेक मुस्लिमांना वाचवण्याचे काम केले होते. चित्रपटात हा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या आहेत."

'अ‍ॅनिमल' चित्रपटावरून वाद वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. 'अ‍ॅनिमल'ने बॉक्स ऑफीसवर आतापर्यंत ४०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bank Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

SCROLL FOR NEXT