Hua Mai Song Out:  Esakal
मनोरंजन

Hua Mai Song Out: रश्मिका-रणबीरच्या केमिस्ट्रीनं पेटवलं रान! 'अ‍ॅनिमल'चं पहिलं गाणं 'हुआ मैं' रिलीज

Vaishali Patil

Hua Mai Song Out:  रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना हे सध्या त्यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांना या दोघांची केमेस्ट्री खुप आवडली आहे. त्यातच या चित्रपटाचं पहिलं गाणं 'हुआ मैं' हे कालपासून चर्चेत आहे.

10 ऑक्टोबर रोजी या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये दोघांच्या लिप-लॉक सीन दाखवण्यात आला होता. पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या गाण्याबाबात अधिकच उत्सुकता वाढली होती. आता हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील रश्मिका-रणबीरची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली आहे. या गाण्यातच रणबीर आणि रश्मिका लग्नबंधनात अडकल्याचे दिसते.

'हुआ मैं' या गाण्याचे बोल मनोज मुंतशिर शुक्ला यांनी लिहिले आहेत. तर राघव चैतन्य आणि प्रीतम यांनी मिळून हे गाणं गायलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता हे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद या गाण्याला मिळत आहेत.

याआधी रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. या चित्रपटात रश्मिकाने गीतांजलीची भूमिका साकारली आहे. तर अनिल कपुर अ‍ॅनिमलच्या वडिलांच्या भुमिकेत दिसणार आहे. बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाची भुमिका साकारणार आहे.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या 'टी-सीरीज', मुराद खेतानीच्या 'सिने१ स्टुडिओ' आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या 'भद्रकाली पिक्चर्स'च्या बॅनरखाली 'अ‍ॅनिमल'ची निर्मिती करण्यात आली आहे.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय या चित्रपटात अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि सौरभ शुक्ला हे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटात 8 गाणी असणार अशी चर्चा आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे. लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' साठी ओळखले जातात. आता त्याच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT