animal movie on ott netflix netizens slam netflix and animal movie team ranbir kapoor  SAKAL
मनोरंजन

Animal on OTT: "अरे चुना लावला!", रणबीर कपूरचा 'ॲनिमल' ओटीटीवर रिलीज होताच नेटकऱ्यांनी का केली टिका?

'ॲनिमल' ओटीटीवर रिलीज होताच नेटकऱ्यांनी टिका केलीय. कारण....

Devendra Jadhav

Animal on OTT News: रणबीर कपूरचा 'ॲनिमल' सिनेमा २०२३ मध्ये चांगलाच गाजला. 'ॲनिमल'वर काही लोकांनी टिका केली तर काहींनी 'ॲनिमल'वर कौतुकाचा वर्षाव केला.

अशातच 'ॲनिमल' ओटीटीवर रिलीज झालाय. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'ॲनिमल' नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. पण 'ॲनिमल' नेटफ्लिक्सवर रिलीज होताच नेटकऱ्यांनी मात्र टिकेचा भडीमार केलाय.

'ॲनिमल'वर नेटकऱ्यांनी केली टिका

नेटफ्लिक्सने शुक्रवार, 26 जानेवारी रोजी 'ॲनिमल' रिलीज झाल्याची बातमी जाहीर केली. यापुर्वी अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता की, ॲनिमल एक्सटेंडेड कटसह नेटफ्लिक्सवर येणार आहे.

याचा अर्थ हा 'ॲनिमल' स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर मूळ सिनेमाशिवाय अतिरिक्त 8 ते 9 मिनिटांच्या फुटेजसह प्रीमियर होणार होता. 'ॲनिमल'ची ही ओटीटी आवृत्ती पाहण्यासाठी चाहते खूप उत्साहित झाले. आणि जेव्हा 'ॲनिमल'चा प्रीमियर दिवस आला तेव्हा विस्तारित कट नसल्यामुळे लोकं निराश झाले आणि त्यांनी 'ॲनिमल'ची टिम आणि नेटफ्लिक्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एक्स्टेंडेड कट नसल्याने 'ॲनिमल'च्या ओटीटी आवृत्तीवर प्रतिक्रिया देताना सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर टीका केली. एका युजरने लिहिले, ''आधी सांगितल्याप्रमाणे Netflix वर एक्सटेंड कटशिवाय 'ॲनिमल' रिलीज झाल्याने आम्ही निराश झालो."

दुसऱ्या युजरने लिहिले, '''ॲनिमल'च्या विस्तारित आवृत्तीचे काय झाले?? तुम्ही 'ॲनिमल' चा विस्तारित कट कधी रिलीज करत आहात.'' अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केलाय.

'ॲनिमल' विषयी सांगायचं झालं तर....

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर आणि प्रेम चोप्रा देखील आहेत.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर आणि प्रेम चोप्रा देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT