animal ott release date netflix ranbir kapoor bobby deol rashmika mandanna tripti dimri  SAKAL
मनोरंजन

Animal OTT Release Date: आता रणबीरचा 'अ‍ॅनिमल' घरबसल्या पाहता येणार, कधी? कुठे? वाचा एका क्लिकवर

रणबीरचा 'अ‍ॅनिमल' थिएटर गाजवून आता OTT रिलीजसाठी सज्ज आहे

Devendra Jadhav

Animal OTT Release Date: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा बॉक्स ऑफीसवर गाजतोय. रणबीरने 'अ‍ॅनिमल'च्या माध्यमातून लोकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. 'अ‍ॅनिमल' सिनेमावर अनेक चांगल्या - वाईट प्रतिक्रिया आल्या असल्या रणबीरच्या अभिनयाचं कौतुक झालं.

रणबीरचा 'अ‍ॅनिमल' ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 'अ‍ॅनिमल' आता OTT रिलीजसाठी सज्ज झालाय.

'अ‍ॅनिमल' या तारखेपासून ott वर होणार रिलीज

'अ‍ॅनिमल' चित्रपट ज्यांनी अद्याप चित्रपटगृहांमध्ये पाहिला नाही ते हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार 'अ‍ॅनिमल' जानेवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

X वरील एका युजरने OTT प्लॅटफॉर्मवर 'अ‍ॅनिमल'च्या रिलीज तारखेचा उल्लेख करणारी पोस्ट शेअर केली. त्यांच्या ट्विटनुसार, "हा चित्रपट २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे."

OTT वर 'अ‍ॅनिमल' मधला डिलीट झालेला हा सीन दिसणार?

'अ‍ॅनिमल' OTT वर रिलीज होत असतानाच क्विंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉबीनं सांगितलं की, "संदीपने थिएट्रीकल रिलीजच्या वेळेस तो किसिंग सीन डिलीट केला होता. मात्र आता जेव्हा तो ओटीटीवर प्रदर्शित होईल तेव्हा तो दाखवला जाईल अशी शक्यता आहे. बॉबीनं म्हटलं आहे की, जेव्हा अबरार आणि रणविजय यांच्यात फाईट होते तेव्हा अबरार अचानक रणबीरला किस करतो. त्यानंतर रणबीर त्याला मारतो."

'अ‍ॅनिमल' विषयी थोडंसं...

बॉक्स ऑफिसवर संदीप वांगाचा अॅनिमल अजुनही मोठी कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटानं आतापर्यत ८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. रणबीर कपूर आणि बॉबीच्या भूमिकेची चाहत्यांना, प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. जगभरातून या चित्रपटानं तब्बल ८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची आहे. बॉबी देओलच्या करिअरमधला हा मोठा चित्रपट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT