Ranbir Kapoor’s ‘Animal’ to release on OTT esakal
मनोरंजन

Animal On OTT : 'ॲनिमल' चे एक्सटेंडेड व्हर्जन प्रदर्शित होणार, थिएटरमध्ये जे 'सेन्सॉर्ड' होतं ते 'ओटीटीवर' दिसणार?

बॉलीवूडचा गेल्या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील आणि वादग्रस्त चित्रपट म्हणू ज्याकडे पाहिले गेले तो (Ranbir Kapoor Animal Movie) रणबीर कपूरचा ॲनिमल नावाचा चित्रपट.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor’s ‘Animal’ to release on OTT : बॉलीवूडचा गेल्या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील आणि वादग्रस्त चित्रपट म्हणू ज्याकडे पाहिले गेले तो (Ranbir Kapoor Animal Movie) रणबीर कपूरचा ॲनिमल नावाचा चित्रपट. ॲनिमल हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या (Animal Released On Netflix) ओटीटीवर तो नेटकऱ्यांना पाहता येणार आहे. मात्र ओटीटीच्या चाहत्यांसाठी मेकर्सनं आणखी एक गोड बातमी शेयर केली आहे.

एका मुलाखतीमध्ये संदीप रेड्डीनं सांगितले होते की, ओटीटीवर जेव्हा (Animal Latest News) ॲनिमल प्रदर्शित होईल तो थिएटरपेक्षा वेगळा असणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित करताना आम्ही काही वेगळे प्लॅन केले (Ranbir Kapoor Latest News) आहे. सुत्रांच्या माहितीनुसार येत्या २६ जानेवारी रोजी रणबीर कपूरचा ॲनिमल हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ॲनिमलचा रनटाईम हा सुरुवातीला ३ तास २१ मिनिटं एवढा होता. आता तो जेव्हा ओटीटीवर येईल त्यावेळी त्याचा कालावधी हा ३ तास २९ मिनिटं (Animal Extended Version) असणार आहे. हे त्या मुव्हीचे एक्सटेंडेड व्हर्जन असणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲनिमलच्या ओटीटी डेब्यूची चर्चा रंगली होती. याबाबत सविस्तर वृत्त इंडिया टुडेनं दिले आहे. सेन्सॉर बोर्डानं ॲनिमल या चित्रपटाला A सर्टिफिकेट दिले होते.

अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीनचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी व्हर्जनमध्ये काही बदल करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. त्या अधिकच्या ९ मिनिटांमध्ये काय असणार याची प्रेक्षकांना, नेटकऱ्यांना कमालीची उत्सुकता आहे.

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केल्याचे दिसून आले आहे. त्यानं तब्बल नऊशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यावरुन त्याची लोकप्रियता किती आहे हे दिसून येईल. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये रणबीर कपूरच्या या चित्रपटानं चाहत्यांना जिंकून घेतल्याचे दिसून आले आहे. आता तर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यानं त्याविषयी अधिक कुतूहल आहे.

ॲनिमल हा गेल्या वर्षी डिसेंबरच्या १ तारखेला प्रदर्शितझाला होता. कबीर सिंग, अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शन करणाऱ्या संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटामध्ये रश्मिक मंदाना, शक्ती कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यात बॉबीच्या भूमिकेनं देखील रणबीर कपूरला जोरदार फाईट दिल्याचे दिसून आले आहे. पुढील वर्षी ॲनिलमलचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT