Animal Ranbir Kapoor Movie Alia bhatt esakal
मनोरंजन

Animal Review : रणबीरचा 'अ‍ॅनिमल' पाहिल्यावर काय होती आलियाची पहिली प्रतिक्रिया?

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल चित्रपटाची सगळीकडे मोठी क्रेझ आहे.

युगंधर ताजणे

Animal Ranbir Kapoor Movie Alia bhatt : साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल चित्रपटाची सगळीकडे मोठी क्रेझ आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी अॅनिमलचे वेगवेगळ्या शहरात प्रीमिअर पार पडले असून त्यावर अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी कौतुक केले आहे. या सगळ्यात रणबीरची पत्नी आलियाच्या प्रतिक्रियेची चर्चा सुरु झाली आहे.

अॅनिमलनं अॅडव्हान्स बुकींगच्याबाबत विक्रमी कमाई केली आहे. त्याबाबत प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचे दिसून आले आहे. जेलरपेक्षा अॅनिमलचे अॅडव्हान्स बुकींग बाबत मोठी झेप घेतली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. रेड्डी वांगाच्या या चित्रपटात रणबीर कपूर सोबत रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

सध्या आलियाच्या त्या प्रतिक्रियेची चर्चा होताना दिसत आहे. आलियाच्या फॅमिलीनं देखील रणबीरचा अॅनिमल पाहिला आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चाहत्यांचा, प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर रणबीरचा अॅनिमल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अॅनिमलच्या प्रीमिअरला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते आलियाच्या एंट्रीनं. चित्रपट पाहून झाल्यानंतर मीडियानं तिला त्याविषयी प्रश्न विचारले तेव्हा आलियानं दिलेलं उत्तर चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. आलिया एका शब्दांत सांगितलं की, खतरनाक... यावेळी आलियासह तिचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान, बहिण शाहीन यांनी देखील अॅनिमलच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

यापूर्वी एका मुलाखतीमध्ये रणबीरनं म्हटलं होतं की, मी आणि आलिया एकमेकांच्या कामात दखल देत नाही. त्यावर सविस्तर चर्चाही करत नाही. प्रतिक्रियांविषयी चर्चा होते. पण आलियाचं मत आणि तिचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप काही सांगून जातो. आलिया आणि मी एकमेकांच्या चित्रपटाविषयी बोलतो, त्यावर चर्चाही करतो. त्यातून अनेक गोष्टी कळतात. असेही रणबीरनं यावेळी म्हटले होते.

अॅनिमलच्या बरोबर विकी कौशलचा सॅम बहादूरही आज प्रदर्शित झाला आहे. त्याची आणि रणबीरच्या अॅनिमलची जोरदार चर्चा होत असून त्यात कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाठींबा मिळणार याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. सध्या तरी अॅनिमलचं पारडं जड असल्याचे नेटकऱ्यांचे, समीक्षकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election Campaign : यायला-जायला वाहन, अन् रोजच्या रोज पैसे बी! महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रॅलीतील शेतमजूर महिलांना रोजगार

Weekly Love Horoscope 12 to 18 January 2026: शुक्र मकर राशीत प्रवेश करताच ‘या’ लोकांच्या लव्ह लाईफमध्ये वाढणार गोडवा

Makar Sankranti 2026: संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरन्हाण का आणि कसं घालतात? वाचा यामागचं खरं कारण

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Nashik Zilla Parishad : बोगस दिव्यांगांचे धाबे दणाणले; नाशिक जिल्हा परिषदेच्या १०६ कर्मचाऱ्यांची मुंबईत होणार तपासणी

SCROLL FOR NEXT