Animal Trailer Ranbir Kapoor Rashmika Mandana 
मनोरंजन

Animal Movie Trailer : 'आपके लिये दुनिया जला दुंगा पापा'! 'अ‍ॅनिमल' चा रानटी ट्रेलर!

प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमलचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे.

युगंधर ताजणे

Animal Trailer Ranbir Kapoor Rashmika Mandana : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमलचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. अशातच त्याच्या समोर आलेल्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे, चाहत्यांचे अन् नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील रणबीरच्या लूकनं तर चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर,सुरेश ऑबेरॉय आणि प्रेम चोप्रा यांच्या भूमिका चित्रपटात लक्षवेधी ठरणार आहेत. यापूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि त्यातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याची चर्चाही झाली होती. त्यावरुन काही अंशी वादही झाला होता. खासकरुन रणबीरचा लूक आणि बॉबी देओलची स्टाईल याचेही कौतुक झाले होते. बॉबीच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या गेलेल्या रश्मिकाचा अन् रणबीरचा तो किसिंग सीनही खूप चर्चेत आला होता. ब्रम्हास्त्र नंतर रणबीर एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येतो आहे. त्यावरुन त्याच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. त्याचे कारण म्हणजे अॅनिमलमधील रणबीरचा स्वॅग. आता अॅनिमलच्या ट्रेलरमधून रणबीरच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. त्यावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

ट्रेलर प्रदर्शित होताच त्यावर लाखो चाहत्यांच्या लाईक्स अन् कमेंटसचा पाऊस पडेल असेही बोलले जात आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या चित्रपटाच्या ट्रेलरचे वेध लागले होते. अखेर तो प्रेक्षकांसमोर आला आहे. बाप आणि मुलगा यांच्या नात्याची गोष्ट वेगळ्या पद्धतीनं अॅनिमलमधून मांडण्यात आली आहे. ज्यात अनिल कपूर यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. काहींनी तर रणबीरनं संजू मध्ये ज्या प्रकारची भूमिका साकारली होती त्याच प्रकारची भूमिका त्यानं अॅनिमलमध्ये केली आहे असे म्हटले आहे.

संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटापूर्वी शाहिद कपूरला घेऊन कबीर सिंग नावाचा चित्रपट केला होता. जो प्रचंड लोकप्रिय झाला होता. शाहिदला त्या चित्रपटानं प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. कियाराच्या करिअरला गिअर अप करण्यातही कबीर सिंगचा वाटा महत्वाचा होता. अशा रेड्डी यांच्या अॅंनिमलकडून चाहत्यांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

SCROLL FOR NEXT