Animal Trailer release Ranbir Kapoor action sequence : esakal
मनोरंजन

Animal Trailer Review : 'अरे देवा, पुन्हा संजय दत्तची केली कॉपी'! काय म्हणावं रणबीरला?

रणबीर कपूरच्या चर्चेतल्या अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

युगंधर ताजणे

Animal Trailer release Ranbir Kapoor action sequence : रणबीर कपूरच्या चर्चेतल्या अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. खरं तर ब्रम्हास्त्रनंतर रणबीरचा एक मोठा प्रोजेक्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतो आहे. अशावेळी त्याच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

ज्यांनी राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला संजय दत्तचा संजू नावाचा बायोपिक पाहिला असेल त्यांना रणबीर कपूरचा तो लूक माहिती आहे. रणबीरचा अॅनिमलमधील पहिला लूक जेव्हा समोर आला होता तेव्हा त्या लूकची तुलना संजूशी करण्यात आली होती. काही सीनमध्ये रणबीर हा संजूमधील संजय दत्त वाटू लागतो. त्यामुळे अॅनिमलमध्ये पुन्हा संजूची तर झलक दिसणार नाही ना, असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेल्या अॅनिमलच्या ट्रेलरनं सोशल मीडियावर मोठी हवा केली आहे. बाप आणि मुलगा यांच्या नात्यावर परखड आणि तितक्यात कमालीच्या संवेदनशीलतेपूर्वक भाष्य करणारा चित्रपट म्हणून अॅनिमलकडे पाहिले जाते. रेड्डीनं यापूर्वी अर्जून रेड्डी आणि कबीर सिंग सारखे चित्रपटातून आपल्या शैलीचा परिचय करुन दिला आहे. तो त्याच्या डार्क सिनेमासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे.

अर्जून रेड्डीतून त्यानं विजय देवरकोंडाला मोठा ब्रेक देत त्याच्याकडून मोठी कामगिरी संदीपनं करुन घेतली होती. त्यानंतर शाहिद कपूरला कबीर सिंगमध्ये घेत त्यानं त्याची लोकप्रियता शिखरावर नेली. शाहिदला कबीर सिंग पासून प्रेक्षक वेगळ्याच चष्म्यातून पाहू लागले. एवढा तो चित्रपट लोकप्रिय झाला होता. त्यातील गाणीही चाहत्यांच्या पसंतीस पडली होती.

अॅनिमलच्या ट्रेलरची सुरुवात होते बाप आणि मुलाच्या एका प्रसंगापासून ज्यात तो बापाला लहान मुलाची अॅक्टिंग करायला सांगतो, पूर्वी त्या भूमिकेत तो होता. आणि तुम्ही माझ्याशी कसे वागत होता हे त्याला त्यातून दाखवायचे आहे. लहानपणापासून वडिलांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या त्याला काही झालं तरी वडिलांना दुखवायचं नाही. म्हणून तो त्यांना काही न सांगता त्यांना न पटणाऱ्या गोष्टी करु लागतो.

वडिलांनी आपल्याकडे लक्ष द्यावं. कधी ना कधी ते आपली दखल घेतील. याकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्याकडील संयम आता संपत चालला आहे. ट्रेलर पाहिल्यावर साधारणपणे या गोष्टी जाणवून जातात. मात्र त्यातील अनिल कपूर यांची भूमिका सोडल्यास पुनरावृत्ती वाटू लागते. नको तितका हिंसकपणा, त्याची कानठळ्या बसविणारी तीव्रता असह्य होऊ लागते. आपण एका ठराविक पातळीनंतर किती हिंसक होऊ शकतो असेही त्यात दाखवण्यात आहे.

थोडक्यात काय तर रणबीरच्या त्या लूकनं पुन्हा तो संजय दत्त तर साकारत नाहीये ना अशा प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. रणबीर संजूमधून अद्याप बाहेर आलेला नाही. असेही नेटकरी म्हणू लागले. आहेत. एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या अॅनिमलमधून हे चित्र अधिक तीव्रतेनं स्पष्ट होईल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT