Animal vs Sam Bahadur Box Office Collection day 9 esakal
मनोरंजन

Box Office Day 9: दुसऱ्या शनिवारी 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर गरूड झेप! तर सॅम बहादुरने कमावले किती कोटी?

दुसऱ्या विकेंडला नवव्या दिवशी चित्रपटाने किती कोटींची कमाई केली?

Vaishali Patil

Animal vs Sam Bahadur Box Office Collection day 9: सध्या मनोरंजन विश्वात फक्त रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटामुळे बराच वाद विवाद झाला. चित्रपटातील संवाद, हिंसा असं बरचं काही वादात असताना देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दिवसेंदिवस अ‍ॅनिमल चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत.

रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या जोडीने संपूर्ण बॉक्स ऑफिस हादरलं आहे. 1 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र एक आठवड्यानंतर देखील या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. आता ‘अ‍ॅनिमल’ने दुसऱ्या विकेंडला नवव्या दिवशी किती कोटींची कमाई केली हे पाहूया.

या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, अ‍ॅनिमलने 63 कोटींच्या कलेक्शनसह धमाकेदार ओपनिंग केली होती. बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कमाई कायम ठेवत, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 338.85 कोटी रुपयांचा कलेक्शन केले होते. आता चित्रपटाच्या रिलीजच्या नवव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहेत.

Sacknilk सुरुवातीच्या अहवालानुसार, अॅनिमलने नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीसह चित्रपटाने एकूण 398. 53 कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा सिनेमा या विकेंडला 500 कोटींचा आकडा पार करेल.

तर दुसरीकडे या चित्रपटाची स्पर्धा विकीच्या 'सॅम बहादुर' या चित्रपटासोबत होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.25 कोटींची कमाई केली होती. SACNL च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 'सॅम बहादूर' ने रिलीजच्या नवव्या दिवशी 6.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन 48 कोटी 5 लाख रुपये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT