Ankita Lokhande Birthday Unknown Facts Of actress... SAKAL
मनोरंजन

Ankita Lokhande Birthday: कोण म्हणतं अंकिताला अभिनेत्री बनायचं होतं..तिला तर... जाणून घ्या Unknown Fact

अभिनेत्री अंकीता लोखंडेचा आज वाढदिवस

सकाळ डिजिटल टीम

Ankita Lokhande Birthday Special: पवित्र रिश्ता' मालिकेतून समोर आलेली आणि अर्चनाची भूमिका साकारल्यानंतर घराघरात प्रसिद्ध झालेली अंकिता लोखंडे आज तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अंकीता तिचा पती विकी जैनसोबत सध्या बिग बॉस 17 मध्ये सहभागी आहे.

इंदूरमध्ये 19 डिसेंबर 1984 रोजी एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्मलेली अंकिता आज चर्चेत पहायला मिळते. पण हे खूप कमी लोकांना माहिती आहे की अंकिता लोखंडेला नेहमीच एअर होस्टेस व्हायचे होते होते. आज वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी.(Ankita Lokhande Birthday Unknown Facts Of actress...)

अंकिता लोखंडेचे नाव तनुजा लोखंडे आहे. अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे हे व्यवसायाने बँकर असून, आई वंदना या शिक्षिका आहेत. इंदूरमधूनच शिक्षण पूर्ण केलेल्या अंकिताला अभिनयात कधीच रस नव्हता आणि तिने अभिनेत्री व्हावे अशी तिच्या घरच्यांचीही इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत जेव्हा अंकिताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा घरच्यांनीही तिला साथ दिली नाही.

अंकिता लोखंडेला नेहमीच एअर होस्टेस व्हायचे होते तिने फ्रँकफिन अॅकॅडमीत प्रवेशही घेतला होता, पण नशिबात जे लिहिलेले असते तेच घडते. झी सिनेस्टारचा शोध इंदूरमध्ये सुरू झाला आणि त्यात तिची निवड झाली. या शोदरम्यान अंकिताला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तिचा कल या दिशेने वाढत गेला. जरी तिच्या पालकांना अंकिताला अभिनेत्री बनताना पाहण्याची इच्छा नव्हती, परंतु मुलीला यात रस असल्याचे पाहून त्यांनीही होकार दिला.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

२००४ मध्ये अंकिता मुंबईत आली आणि तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला. यानंतर तिला 'बली आयु को सलाम' या शोमधून पदार्पण करण्याची संधी मिळाली, पण तो शो कधीच प्रसारित झाला नाही. यानंतर अंकिताला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मध्ये काम मिळाले, ज्यामध्ये अर्चनाच्या भूमिकेने तिला एक वेगळी ओळख दिली. या शोमुळे अंकिता घराघरात प्रसिद्ध झाली. यानंतर ती 'झलक दिखला जा ४' मध्ये दिसली. २०१९ मध्ये अंकिताने कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. २०२० मध्ये ती टायगर श्रॉफसोबत 'बागी 3' मध्येही दिसली होती.

अंकिता लोखंडेला 'झलक दिखला जा 4' दरम्यान 'पवित्र रिश्ता' को-स्टार आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने प्रपोज केले होते. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, मात्र २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता तुटली होती आणि अशा परिस्थितीत विकी जैन तिचा आधार बनला. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि 2019 मध्ये विकीने अंकिताला लग्नासाठी प्रपोज केले. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर दोघेही 'स्मार्ट जोडी' शोमध्ये एकत्र दिसले आणि त्याचे विजेते ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT