Ankita Lokhande google
मनोरंजन

अंकिता लोखंडेनं साजरी केली लग्नानंतरची पहिली संक्रांत;पहा व्हिडीओ

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरची आवडती स्टार असलेली अंकिता लोखंडे सध्या भलतीच चर्चेत आहे. खरंतर सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता जणू लॅमलाइटपासून दूरच गेली होती. पण विकी जैन तिच्या आयुष्यात आला अन् पुन्हा अंकिताचं आयुष्य एका चांगल्या वळणावर आलं. तिनं बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमवायला नव्याने सुरुवात केली. कंगनाच्या 'मणिकर्णिका' मध्ये तिला चांगली भूमिका वाट्याला आली अन् ती चर्चेतही आली. अंकिताच्या एका गोष्टीनं सर्वांनाच तिच्या चांगुलपणाची दखल घ्यायला भाग पाडलं होतं ते म्हणजे सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी तिनं दिलेला पाठिंबा. तिनं कुठलाही मागचा राग मनात न ठेवता त्यावेळी सुशांतच्या कुटुंबाला खूप सहकार्य केलं होतं. अंकिताचं विकीसोबतचं रिलेशन आणि त्यांचं लग्न हे देखील खूप चर्चेत राहिलं.

व्हूम्पला व्हिडीओनं अंकिताच्या पहिल्या संक्रांतीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अंकिता २०२१च्या डिसेंबर महिन्यात तिचा लॉंग टाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. मुंबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तिनं केलेलं लग्न चांगलंच गाजलं. तिच्या मेहेंदी,संगीत,हळदी,साखरपुडा सोहळ्याच्या सेलिब्रेशनच्या व्हिडीओनी चाहत्यांना जणू जंगी मेजवानीच दिली. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या डिझाइनर लेहेंग्यात सजलेली अंकिता खूपच सुंदर दिसत होती. अंकितानं लग्नाच्या सोहळ्यात मराठमोळेपणा ही जपलेला दिसून आला. अर्थात ती महाराष्ट्रीयन असल्याने हे तर अपेक्षितच होतं. पण अनेकदा ग्लॅमरच्या नावाखाली सेलिब आपलं मूळ विसरतात पण अंकितानं मात्र तिच्या लग्नात आपली संस्कृती जपत सगळे सोहळे पार पाडलेले दिसून आले. आता लग्नानंतर तिचा पहिल्या संक्रात सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हूम्पलातर्फे पोस्ट करण्यात आलाय.

अंकितानं तिची पहिली संक्रात आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत सेलिब्रेट केली. तिनं छान काळ्या रंगाची काठाची ट्रेडिशनल साडी नेसलेली आहे. हलव्याचे पारंपरिक दागिने घालून,हातात हिरव्या रंगाचा चुडा घातलेल्या अंकिताचं रुप संक्रांतीला खूपच खुलून आलेलं दिसत होतं. तिच्या संक्रांतीच्या निमित्तानं हळदी-कुंकूचा समारंभही आयोजित करण्यात आलेला होता. व्हिडीओमध्ये अंकिता हळदी-कुंकू आपल्या आईला अन् मैत्रिणीला लावताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ काहीच तासात खूप व्हायरलही झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

Lightning Strike : गेवराईत वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला जखमी

Electricity Shock : एमआयडीसीत सेल्को एक्स्ट्रुजन कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

SCROLL FOR NEXT