Ankita lokhande And Madhuri dixit esakal
मनोरंजन

VIDEO: धकधक गर्ल माधुरीसोबत थिरकली अंकिता लोखंडे; 'एक दो तीन' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Madhuri Dixit And Ankita Lokhande Dance Video: अंकितानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि माधुरी या दोघी 'एक दो तीन' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

priyanka kulkarni

Madhuri Dixit And Ankita Lokhande Dance Video: प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बिग बॉस या कार्यक्रमामुळे चर्चेत होती. 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या शोमध्ये अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांनी सहभाग घेतला होता. पण अंकिता आणि विकी हे दोघेही हा शो जिंकू शकले नाहीत. अशताच आता विकी, अंकिता आणि बिग बॉसमधील काही स्पर्धकांनी 'डांस दीवाने' या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अंकितानं धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) डान्स केला.

अंकितानं शेअर केला व्हिडीओ

अंकितानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि माधुरी या दोघी 'एक दो तीन' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला अंकितानं कॅप्शन दिलं, "एक स्वप्न पूर्ण झालं, त्यांचे अभिजात नृत्य आणि त्यांचे स्मित हास्य ही आनंदाच्या दुनियेची एक झलक आहे. जेव्हा मी त्यांना पाहते आणि त्यांच्यासोबत नृत्य करण्याची संधी मला मिळते तेव्हा मला आठवण होते की, खरी कलात्मकता कौशल्याच्या पलीकडे असते धन्यवाद, माधुरी मॅडम, केवळ एक अभूतपूर्व कलाकार म्हणून नव्हे तर प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून सतत प्रेरणास्त्रोत असल्याबद्दल. मैं माधुरी दीक्षित बनाना चाहती हूं! लव्ह यू माधुरी मॅम"

पाहा व्हिडीओ:

विकी आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज

डान्स दिवाने या कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ अंकितानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बिग बॉसमध्ये अनेक वेळा विकी आणि अंकिता यांचे भांडण झाले. अशताच विकी आणि अंकिता यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना डान्स दिवाने या शोमध्ये बघायला मिळाला.

2021 मध्ये अंकिता आणि विकी यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT