ankita on sushants claustrophobia 
मनोरंजन

रिया म्हणाली होती 'सुशांतला विमानात भिती वाटायची', अंकिता लोखंडेने सुशांतचाच 'तो' व्हिडिओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत मृत्यु प्रकरणात दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत.या प्रकरणात रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं जातंय. अशातंच सगळ्यांच लक्ष रियावर आहे. अनेक दिवस मौन बाळगल्यानंतर रिया या प्रकरणावर बोलती झाली आहे. एका मुलाखतीत तिने सुशांतबद्दल त्याला असलेल्या भितीचा दावा केला आहे. रिया चक्रवर्तीचा हा दावा मोडून काढण्यासाठी अंकिता लोखंडेने कोणाचंही नाव न घेता सडेतोड उत्तर दिलं आहे.

रियाने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की जेव्हा आम्ही युरोप ट्रीपवर जात होतो तेव्हा सुशांतने सांगितलं की त्याला विमानात बसण्याची भिती वाटते. यासाठी तो मोडाफिनिल नावाची गोळी घ्यायची. आमच्या फ्लाईटच्या आधी त्याने ती गोळी घेतली कारण ती नेहमी सुशांतच्या जवळ असायची. रिया चक्रवर्तीचा हा दावा मोडून पाडण्यासाठी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने १ मिनिट ५६ सेकंदचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुशांत विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या सीटवर बसून विमान उडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'हा आहे का क्लस्ट्रोफोबिया ? तुला नेहमीच उडायचं होतं आणि तू ते केलंस. आम्हा सगळ्यांना तुझ्यावर गर्व आहे.' अंकिताने तिच्या या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलं नाहीये मात्र तीने सरळ सरळ रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला आहे. 

रियाने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं की कदाचित २०१३ मध्ये सुशांतसोबत असं काही घडलं होतं ज्यामुळे डिप्रेशनसारख्या गोष्टी त्याच्यासोबत घडायला लागल्या. तेव्हा तो मानसोपचार तज्ज्ञांना भेटला होता. त्यांचं नाव होतं हरेश शेट्टी, त्यांनी सुशांतच्या औषधाबाबत सांगितलं होतं.   

ankita lokhande exposed and refuted a claim made by rhea in her interview about his claustrophobia  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT