Ankita Lokhande
Ankita Lokhande Instagram
मनोरंजन

Ankita Lokhande: लता मंगेशकरांच्या निधनाच्या दिवशी केला डान्स, झाली ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटिझन्सना राग आला आहे. व्हिडिओमध्ये ती हार्डी सिंधूच्या (Hardy Sindhu) लोकप्रिय 'बिजली' (Bijli) गाण्यावर कारमध्ये नाचताना दिसत आहे. प्रख्यात गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या दुःखद निधनाच्या दिवशी तिने असा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल तिची निंदा केली.

व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या पतीसोबत कारमध्ये दिसत आहे. ती 'बिजली बिजली'च्या तालावर थिरकताना दिसत आहे. अनेक यूजर्सनी कमेंट्समध्ये तिच्यावर राग व्यक्त केला.

एका यूजरने लिहिले की, "मॅडम, तुम्ही शोक व्यक्त करा, तुम्ही हे सर्व उद्या करू शकता."दुसर्‍याने लिहिले, "थोडी तरी लाज बाळगा... जेव्हा संपूर्ण देश लता दी यांच्या निधनावर शोक करत आहे, तेव्हा तुम्ही डान्स आणि आनंद लुटतानाचे व्हिडिओ पोस्ट करत आहात... ते देखील जेव्हा तुम्ही त्याच बंधुभगिनीतून आहात."

User's comments on Ankita Lokhande's video

गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ लता दीदी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डॉक्टर सर्वोतोपरी उपचार करत होते. मात्र मल्टिपल ऑर्गन फेल्युयर झाल्यानं त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे सांगण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गौरव खन्ना (Gaurav Khanna), नकुल मेहता (Nakul Mehta), कपिल शर्मा (Kapil Sharma), हिना खान (Hina Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांच्यासह अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना शोक व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेच्या भीतीने काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणं टाळलं - अमित शाह

SCROLL FOR NEXT