ankita lokhande 
मनोरंजन

गणेश चतुर्थीनिमित्त अंकिता लोखंडेने फोटो शेअर करत म्हटलं, 'गणपती बाप्पा, मी वाट पाहतेय...'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- देशभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह आहे. खास करुन महाराष्ट्रात गणपती बाप्पाची वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. यावर्षी अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे विकी जैनसोबत तिचं नातं पक्क झालं आहे तर दुसरीकडे एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युने तिला मोठा धक्का दिला आहे. अशातंच गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिताने गणपती बाप्पाकडे एक इच्छा व्यक्त केली आहे.

अंकिता लोखंडेने शनिवारी इंस्टाग्रामवर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो गेल्या वर्षीचे म्हणजेच २०१९ मधील आहेत. अंकिताने हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे. 'मी या वर्षी माझ्या गणपती बाप्पाला भेटण्याची वाट पाहत आहे. गणपती बाप्पा लवकर या.' सुशांतच्या मृत्युनंतर अंकिताचा भूतकाळ पुन्हा एकदा तिच्यासमोर येऊन उभा आहे. ती सतत सुशांतला न्याय मिळावा याची मागणी करत आहे. अंकिताने अनेकदा म्हटलंय की सुशांतसारखा व्यक्ती आत्महत्या कधीच करु शकत नाही. 

सुशांत प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवल्यावर तिने म्हटलं होतं आता न्याय मिळेल. अंकिता आणि सुशांतने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ज्यानंतर अनेक वर्ष दोघांचं अफेअर चाललं मात्र काही कारणांमुळे त्यांच ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगळे झाले. असं असलं तरी सुशांतला न्याय मिळवून देण्याासाठी ती सुशांतच्या कुटुंबासोबत उभी आहे. तसंच पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ते करण्याचीही तिची तयारी असल्याचं तिने अनेकदा सांगितलं आहे.   

ankita lokhande shares ganesh chaturthi pictures writes this year i am waiting ganpati bappa  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT