Sushant Singh Rajput with his father and sisters, Ankita Lokhande and her husband Vicky Jain Google
मनोरंजन

सुशांतच्या कुटुंबाकडून अंकिता लोखंडेला मिळालं लग्नाचं 'हे' खास गिफ्ट

मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच तिचा विवाहसोहळा पार पडला

प्रणाली मोरे

'पवित्र रिश्ता' या एकता कपूरच्या मालिकेतनं एक गोड हसरा चेहरा आपल्या भेटीस आला आणि भारताच्या घराघरात तो प्रत्येकाच्या आवडीचा बनला,तो म्हणजे अंकिता लोखंडेचा. मालिकेत तिनं साकारलेली 'अर्चना' ही भूमिका पाहून प्रत्येकाला वाटू लागलं मुलगी असावी तर अशी,बायको मिळावी तर अशी आणि सुनेच्या रुपात तिच्यासारखंच कुणीतरी यावं. 'पवित्र रिश्ता'नंतर अंकितानं फारसं काही काम केलं नसलं तरी मालिकेसोबतच दिवंगत सुशांत सिंग राजपुतची गर्लफ्रेंड म्हणूनही तिच्याभोवती कायम ग्लॅमरचं वर्तुळ असायचंच. पण सुशांत आणि तिचं ब्रेकअप झालं अनं मानवची ही अर्चना काही काळ इंडस्ट्रीतनं जणू गायब झाल्यासारखीच झाली. पुढे 'मणिकर्णिका' या सिनेमातनं तिनं बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केलं.

आता कुठे करिअर मस्त सुरू झालं असं तिला वाटत असताना पुन्हा ज्या गोष्टीतनं स्वतःला सावरत तिनं आयुष्य मोठ्या उत्साहात सुरू केलं होतं त्याला दु:खाचा पुन्हा ब्रेक लागला. ते म्हणजे सुशांत सिंग राजपूतनं केलेली आत्महत्या. अंकिता-सुशांतमध्ये जे काही घडून गेलं होतं त्याचा जरादेखील विचार न करता अंकिता त्यावेळी सुशांतच्या कुटुंबासोबत उभी राहिली. त्यामुळे सुशांतचे कुंटुंबिय आणि अंकिता अधिक जवळ आले. अंकिताच्या अनेक पोस्टवर सुशांतच्या बहिणींनी केलेल्या सकारात्मक कमेंट्स याचा दाखला म्हणून घेता येतील. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विकी जैन अंकिताच्या आयुष्यात आला अनं त्यानेच तिला पुन्हा आयुष्याच्या चांगल्या वळणावर आणून ठेवले असं तिनं बरेचदा सगळीकडे सांगितले आहे. आपल्या या बॉयफ्रेंडसोबत तिनं नुकतंच मुंबईत लग्न केलं आहे.

तिच्या लग्नाला अनेक कलाकारांनी म्हणजे जे तिचे खास आहेत अशांनी उपस्थिती दर्शवली होती. तर लग्नानंतर तिने जे आपले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले त्यावरही अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये एक शुभेच्छांची पोस्ट लक्ष वेधून घेतेय. ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतची लहान बहिण श्वेताची. तिनं अंकिताला ''अभिनंदन,नवविवाहीत जोडप्याला खूप खूप शुभेच्छा. श्र्वेता''. असे लिहीले आहे. अंकितासाठी ही शुभेच्छा म्हणजे कुठल्याही महागड्या गिफ्टसाठी कमी नसेल एवढं मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT