Ankush Chaudhari Exclusive podcast interview in sakal for maharashtra shaheer movie know about why he accept shahir sable role sakal
मनोरंजन

Ankush Chaudhari Exclusive: शाहिरांशी ना चेहरा जुळत होता ना आवाज.. तरिही का स्विकारली भूमिका? अंकुश स्पष्टच बोलला..

अभिनेता अंकुश चौधरीची विशेष मुलाखत..

नीलेश अडसूळ

Ankush Chaudhari Exclusive about Maharashtra Shahir movie: सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा,नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. पन्नाशी गाठलेला हा अभिनेता आजही तितकाच चिरतरुण आहेम आणि तशा दमदार भूमिकाही तो साकारत असतो. मग दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळ मधला सूर्या.. त्याच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला वेड लावलं.

आता 'महाराष्ट्र शाहीर'चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. तो शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असून त्याच्या आयुष्यातील हा पहिला बायोपिक आहे. याच निमित्ताने द मोस्ट यंग अँड हँडसम अंकुश चौधरीशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधण्यात आला..

यावेळी अंकुश साकारत असलेल्या शाहीर साबळे यांच्या भूमिके बाबत त्याने एक मोठा खुलासा केला. ही भूमिका का साकारली त्यामागे दडलेले कारण त्याने सकाळ डिजिटलशी बोलताना सांगितले..

(Ankush Chaudhari Exclusive podcast interview in sakal for maharashtra shaheer movie know about why he accept shahir sable role)

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट जाहीर झाला तेव्हा सगळ्यांच्याच माना उंचावल्या. कारण शाहीर साबळे यांचं संगीत क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं काम इतकं मोठं आहे की हा चित्रपट अत्यंत महत्वाचा मानला गेला. त्यामुळेच या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली होती.

आणि अखेर केदार शिंदे यांनी याची घोषणा करत अंकुश चौधरी ही भूमिका करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांना थोडा धक्का बसला. कारण शाहीर साबळे यानी अंकुश चौधरी यांच्यात कसलेच साम्य नाही. ना आवाज, ना चेहरा.. कशातच सारखेपणा नाही. अशा वेळी बऱ्याचदा सारखा दिसणारा चेहरा निवडला जातो. पण अंकुशच्या बाबतीत तसे नव्हते. मग त्याने ही भूमिका का स्वीकारली याविषयी तो 'सकाळ डिजिटल' शी बोलला आहे.

या मुलाखतीत अंकुश म्हणाला, 'केदार हा चित्रपट करत आहे हे मलाही माहीत होतं पण त्यात मी असेल असं मला वाटलं नाही.जेव्हा मला केदार चा कॉल आला तेव्हा मलाच आश्चर्य वाटलं. मी शाहीर साबळेंसारखा दिसत नाही हे मलाही वाटलं. ही भूमिका मी कशी करणार याचं मलाही टेंशन आलं होतं. पण ही भूमिका करायला तयार झालो कारण एक गोष्ट केदार ने मला दाखवली.'

'मी ऐकत नाही म्हंटल्यावर केदार मला त्यांच्या घरी घेऊन गेला. त्याने शाहीर साबळे यांचे जुने फोटो मला दाखवले. त्यावेळी केदारने त्यांच्यातील आणि माझ्यातील अनेक सारख्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. त्यावेळी मला पटलं आपण ही भूमिका करू शकतो..'

सोबतच या भूमिकेसाठी काही खास गोष्टी अंकुशला कराव्या लागल्या.त्यासाठी त्याने दीड वर्ष जीवाचं रान केलं. याशिवाय अनेक किस्से असे घडले जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पण हे सर्व जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या पॉडकास्ट लिंक वर क्लिक करा आणि अंकुशने सांगितलेल्या गुलदस्त्यातल्या गोष्टी नक्की ऐका..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT