Ankush Chaudhari Podcast: Esakal
मनोरंजन

Ankush Chaudhari Podcast: लाखो मुलींचा क्रश असणारा अंकूश मात्र 'या' अभिनेत्रीवर फिदा..

Vaishali Patil

Ankush Chaudhari Podcast: अभिनेता अंकुश चौधरी मराठीतील चॉकलेट हीरो असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. पन्नाशी गाठलेली अंकुश तारुण्याच्या बाबतीत अगदी आताच्या हिरोंनाही तगडी टक्कर देतो. अ‍ॅक्शन हिरो असो किंवा रोमँटिक हिरो अंकुश सगळ्याच भुमिकेत शोभूनच दिसतो. त्याने आजवर 'डबल सीट', 'दगडी चाळ', 'ती सध्या काय करते', 'धुराळा' असे अनेक चित्रपट हीट केले आहेत.

आता मात्र अंकुश एका नव्याकोऱ्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात तो शाहीर साबळे यांची भुमिका साकारत आहे. महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातुन तो त्याच्या आयुष्यातील बायोपिक सिनेमा करत आहे.

त्याच्या 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगल्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याच निमित्ताने अंकुश चौधरीशी सकाळ मनसोक्त गप्पा मारल्या आहे. नुकतच अंकुशने सकाळ डिजिटलच्या unplugged पोडकास्टच्या निमित्ताने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

यात त्याने 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाविषयी त्याचा अनुभव सांगितला त्याचबरोबर त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला.

अंकुश चौधरी हा सुरवातीपासूनच एका चॉकलेट बॉयच्या भुमिकेत दिसला आहे. त्याचे चित्रपट पाहिल्यानंतर मुली त्याच्या प्रेमात पडतात. त्याच्या चाहत्यांची संख्याही अफाट आहे. तो नेहमीच मुलींच्या मनावर राज्य करतो. मात्र त्याच्या मनावर राज्य करते ती एकच त्याची बायको अभिनेत्री दिपा परब. मात्र ज्यावेळी अंकुशला त्याच्या क्रश बद्दल विचारलं त्यावेळी त्याने याबाबत खुलासा केला.

तु तर सर्वांचाच क्रश आहे मात्र तुझी क्रश कोण असं विचरल्यावर अंकुश म्हणला की, 'मला असं वाटतं की मी जितकेही चित्रपट केले आहेत,ज्याअभिनेत्री बरोबर मी काम केलीत त्या सर्वच अभिनेत्री खुप कमाल आहेत. त्याचा अभिनय असो त्याचा स्वभाव असो सगळचं खुप छान होतं.'

पुढे तो म्हणला, 'पण क्रश बद्दल सांगायचं झाल तर लहानपणापासून मला मधुबाला खुप आवडायची. त्या आजही मला आवडतात. त्यानंतर मी असा विचार केली नाही. की मला क्रश वैगरे कोणी आवडेल नाही. '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT