sushant singh rajput 
मनोरंजन

सुशांतच्या आणखी एका चाहत्याने केली आत्महत्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांमध्ये तर तणावाचं वातावरण आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना एवढा धक्का बसला आहे की कित्येकजणा  त्याचा मृत्यु सहन करु शकत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की सुशांतच्या आत्महत्येचा धक्का पचवू न शकल्याने त्याच्या पटनामधील चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता अशी बातमी समोर येतेय की सुशांतच्या आणखी एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. 

सुशांतचे चाहते त्याच्या मृत्युचा धक्का पचवू शकत नाहीयेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार १७ जुन रोजी अंदमान येथील पोर्ट ब्लेअरमध्ये राहणा-या १५ वर्षाच्या किशोरीने गळफास लावून आत्महत्या केलीये. किशोरीने कोणतीही सुसाईट नोट ठेवलेली नाही. मात्र पोलिसांच्या हाती एक डायरी हाती लागली आहे ज्यात तिने सुशांत सिंह राजपूतविषयी चर्चा केलेली दिसून येतेय. 

दिवंगत किशोरीच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितलं की काही काळापासून ती नैराश्याने ग्रस्त होती. पोलीस आता हे प्रकरण सुशांतच्या आत्महत्येशी जोडत आहेत आणि तिच्या डायरीच्या आधारे तिच्या मृत्युचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

याआधी उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये एका शाळेतील मुलाचा मृत्यु झाला होता. त्याच्या कुटुंबाने सांगितलं की मरणाआधी त्याने त्याच्या भावाला सांगितलं होतं की जर सुशांत सिंह सारखा व्यक्ती आत्महत्येचं पाऊल उचलू शकतो तर तो पण असं करु शकतो.

सुशांतच्या अचानक जाण्याने कोणालाच हा धक्का पचवता येत नाहीयेत. सुशांतचे कोणतीच सुसाईड नोट न ठेवल्याने त्याच्या आत्महत्येमागचं कारणंही अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र पोलीस या प्रकरणात कसून तपास करत आहेत तसंच त्याच्या जवळच्या वक्तींचे जबाबही नोंदवत आहेत.  

another sushant singh rajput fan committed suicide in port blair

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT