anshula kapoor and arjun kapoor Sakal
मनोरंजन

Arjun Kapoor: बहिणीला स्टेजवर पाहून अर्जुन कपूरचा आनंद गगनात मावेना..., व्हिडिओ व्हायरल

अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांच्यातील प्रेम इंडस्ट्रीत कोणापासूनही लपलेले नाही. दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांच्यातील प्रेम इंडस्ट्रीत कोणापासूनही लपलेले नाही. दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात.

अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या बहिणीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. तर, नुकतेच अर्जुनची लाडकी बहीण अंशुलाने रॅम्पवर तिची मोहिनी पसरवली आहे. रॅम्पवर बहिणीला पाहून अर्जुनला स्वतःला सावरता आले नाही आणि त्याने सर्वांसमोर आपला आनंद व्यक्त केला.

अंशुला कपूरने नुकतेच मुंबईतील फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यादरम्यान अर्जुन आपल्या बहिणीला सपोर्ट करायला पोहचला होता. आपल्या बहिणीला रॅम्प वॉक करताना पाहून अर्जुनच्या आनंदाला पारावार उरला नाही.

अंशुला स्टेजवर येताच अर्जुन जोरदार टाळ्या वाजवतो आणि मग तो त्याच्या खुर्चीवरून उभा राहतो आणि त्याच्या बहिणीला चीयर करतो. हे पाहून अंशुलासोबत उपस्थित असलेले सर्वजण हसू लागते. अंशुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंशुला कपूरने मुंबईतील फॅशन वीकमध्ये शिमरी ड्रेसमध्ये रॅम्पवर धमाका केला. अंशुला कपूर या शिमरी ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. तिचा हा ड्रेस शिमरी आणि ट्रांस्पेरेंट होता.

अंशुलाने या ड्रेससोबत केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर अंशुलाच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओवर चाहते त्यावर कमेंट करत अंशुलाचे कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bajirao Road Murder: पुण्यात कायद्याचा धाकच संपला? बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने खून, रस्त्यावर रक्तपात

Latest Marathi News Live Update : शिरुर तालुक्यात बिबट्या जेरबंद; तीन बळींच्या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक

Shukra Transit: २६ नोव्हेंबरपर्यंत तूळ राशीत राहणार शुक्र; मेष, वृषभसह 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव

Nashik Crime : कार्तिकी एकादशीला अवैधरीत्या दारू विक्री! महागड्या कारसह साडेसात लाखांचा मद्यसाठा जप्त, एकाला अटक

59 वर्षाच्या सलमानचा शर्टलेस लूक पाहून तरुणी घायाळ, सिक्स पॅक आणि अ‍ॅब्स पाहून अनेकांचं हार्टफेल

SCROLL FOR NEXT