kartik-Aryan 
मनोरंजन

'कार्तिक आर्यनविरोधातील मोहीम अन्यायकारक'; अनुभव सिन्हांनी व्यक्त केली चिंता

कार्तिकला विविध प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत.

स्वाती वेमूल

अभिनेता कार्तिक आर्यनला Kartik Aaryan विविध चित्रपटांमधून काढून टाकण्याबाबत आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा Anubhav Sinha यांनी चिंता व्यक्त केली आहे. कार्तिकविरोधातील ही मोहीम अन्यायकारक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत या विषयावर भाष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून कार्तिकला विविध प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. आधी धर्मा प्रॉडक्शन्सच्या एका चित्रपटातून आणि नंतर शाहरुख खानच्या एका चित्रपटातून त्याला काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा होत्या. एकीकडे कार्तिकचं बेजबाबदार वागणं याला कारणीभूत असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर दुसरीकडे त्याच्याविरोधातील ही इंडस्ट्रीतील मोहीम असल्याचं अनुभव सिन्हा यांचं मत आहे. (Anubhav Sinha says reports of Kartik Aaryans ouster from films are part of a concerted campaign)

'जेव्हा निर्माते अभिनेत्याला काढून टाकतात किंवा अभिनेता निर्मात्यांसोबत काम करणं सोडतो, तेव्हा याबद्दल बोललं जात नाही. हे नेहमी होत असतं. कार्तिक आर्यनविरोधातील या मोहिमेची मला चिंता वाटू लागली आहे. हे खूपच अयोग्य असून त्याने बाळगलेल्या मौनाचा मी आदर करतो', असं ट्विट अनुभव यांनी केलंय. अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याविषयी निर्माते बोलत नाही, असं त्यांनी म्हटलं. आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपटातून कार्तिकला काढून टाकण्यात आल्याच्या चर्चांनंतर त्यांनी हे ट्विट केलं. मात्र, मी कार्तिकला कधी चित्रपटात घेतलंच नव्हतं, असं नंतर आनंद एल. राय यांनी स्पष्ट केलं.

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कार्तिकने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 'अनप्रोफेशनल' वागणुकीमुळे कार्तिकला 'दोस्ताना २'मधून काढून टाकण्यात आल्याच्या सर्वांत आधी चर्चा सुरू झाल्या. नंतर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपटातील कलाकार पुन्हा निवडणार असल्याचं स्पष्ट केलं. या चित्रपटात कार्तिक हा जान्हवी कपूर आणि लक्ष्य यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार होता. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. मात्र नंतर कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे शूटिंग थांबवण्यात आलं. याचदरम्यान कार्तिकने शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट निर्मित 'फ्रिडी' या चित्रपटाची ऑफर स्विकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT