Anup Jalota Video  esakal
मनोरंजन

Anup Jalota Video : 'आता भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करुन टाका', कारण...अनुप जलोटांचा सूर

जलोटा यांनी आता भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.असे विधान केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anup Jalota Video : आपल्या अवीट स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनसम्राट अनुप जलोटा यांचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या कार्यक्रमांना, सत्संगांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. मात्र यासगळ्यात अनुप जलोटा हे त्यांच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

आताही अनुप जलोटा यांनी सोशल मीडियावर शेयर केलेला व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. जलोटा यांनी आता भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.असे विधान केले आहे. त्याचे कारणही त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. यापूर्वी काही नेत्यांनी अशीच मागणी केली होती. त्यावरुन त्यांच्यावर टीकाही झाली होती.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

जलोटा यांनी आपल्या त्या व्हिडिओमध्ये भारताला आता हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे.काश्मिरमध्ये जे काही बदल झाले आहेत. त्यानं काही फारसा फरक पडत नाही. आता तिथं आतंकवादी कारवाया बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान हा मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित झाला. कारण त्या देशामध्ये मुस्लिम सर्वाधिक होते.

भारतामध्ये हिंदूची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या राष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे. ठीक आहे हे पूर्वीच होणे जास्त महत्वाचे होते तेव्हा झाले नाही पण आता ते व्हायला हवे.असेही जलोटा यांनी म्हटले आहे. आता तर देशामध्ये हिंदूत्वाची लाट आणखी वाढताना दिसत आहे. लोकं अधिक सक्रिय होताना दिसत आहे. बाकीचे जे काही बोलतात त्याला अर्थ नाही.

काश्मिरमध्ये परिस्थिती पाहिल्यास तिथे पहिल्यापेक्षा आता कमी हल्ले होत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या जे काही होताना दिसत आहे ते लोकांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करावा. अशी प्रतिक्रिया जलोटा यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT