Anupam Kher Announces New Project, To Portray Rabindranath Tagore In His Next first look viral  SAKAL
मनोरंजन

Anupam Kher Upcoming Movie : अनुपम खेर साकारणार रविंद्रनाथ टागोर, अभिनेत्याचा लुक पाहून फॅन्सना सुखद धक्का

Ravindranath Tagore : गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांची भुमिका अनुपम खेर साकारणार आहेत.

Devendra Jadhav

Anupam Kher as Gurudev Ravindranath Tagore: अनुपम खेर हे भारतीय मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते. अनुपम खेर यांनी आजवर विविध भुमिकांमधुन केवळ बॉलीवूड नव्हे तर हॉलीवुडमध्येही अभिनय केलाय.

अनुपम खेर यांच्या अनेक भुमिका चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. अनुपम खेर यांनी सोशल मिडीयावर त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांची भुमिका अनुपम खेर साकारणार आहेत.

(Anupam Kher Announces New Project, To Portray Rabindranath Tagore In His Next first look viral )

अनुपम खेर यांनी रविंद्रनाथ टागोरांचा एक लुक सोशल मिडीयावर शेअर केलाय. या लुकमध्ये अनुपम खेर हुबेहूब रविंद्रनाथ टागोर दिसत आहेत.

अनुपम खेर यांनी हा लुक शेअर करुन लिहीलंय की.. माझ्या ५३८व्या आगामी प्रोजेक्टमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारताना आनंद झाला.

योग्य वेळी तपशील उघड करेन. गुरुदेवांना पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मिळाले हे माझे भाग्य आहे! या चित्रपटाची अधिक माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करू!

अनुपम खेर यांनी फर्स्ट लुक शेयर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट करुन या लुकला पसंती दर्शवली. "ओम सर, तुम्ही खरंच त्यांच्यासारखे दिसता,"

"अभिनंदन सर, मी या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे." "व्वा.. ग्रेट...ऑल द बेस्ट सर," अशा कमेंट करत फॅन्सने अनुपम खेर यांच्या लुकला पसंती दिली.

रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आणि इतर अनेक गाणी तयार केली.

त्यांना गुरुदेव, कबिगुरु आणि बिस्वकाबी यासह अनेक नावांनी ओळखले जाते. याशिवाय त्यांना सामान्यतः 'बंगालचा बार्ड' म्हणून संबोधले जाते.

रविंद्रनाथ टागोरांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी "भानुसिंह" हे टोपणनाव वापरून त्यांचा पहिला कवितासंग्रह तयार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT