बालपणीचे अनुपम खेर आई दुलारीसोबत अनुपम खेर फेसबुक
मनोरंजन

आई तू मला 'गंजा पटेल' हाक का मारतेस?

अनुपम खेर यांचा आई दुलारीला सवाल

सकाळ डिजिटल टीम

अनुपम खेर (anupam kher) यांच्या डोक्यावर नसलेले केस (bald) फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या यशाच्या वाटेत कधीही अडसर म्हणून उभे राहिले नाहीत. पण असं असलं तरीही आपल्या डोक्यावर एकही केस नाही ही सल त्यांना आजही खुपतेय. आज त्यांनी आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय, जो व्हायरल होतोय आणि त्यामध्ये अनुपम खेर यांच्या आईने त्यांच्या केसांविषयी सांगितलेले किस्से ऐकून हसावे की आईसमोर हतबल झालेल्या अनुपम खेर यांचे सांत्वन करावे यावरून चाहत्यांची मोठी पंचाईत झालीय.

सगळ्या जगासाठी जरी ते अनुपम खेर असले तरी त्यांची आई मात्र त्यांना लहानपणापासून 'गंजा पटेल' या नावाने हाक मारते. अर्थात आई हे नाव लाडाने घेत असली तरी आपल्याला ती अशी हाक लहानपणापासूनच का मारते याविषयी अनुपम यांचा आक्षेप होता. आणि आज संपूर्ण जगासमोर अखेर अनुपम यांनी आईला 'गंजा पटेल' का म्हणते असा प्रश्न विचारलाच. पण आईने इथे त्यांना सांत्वन करणारं उत्तर न देता अनुपम यांना टक्कल कधीपासून आहे ह्यामागचे लहानपणापासूनचे किस्से सांगितले ते ही अगदी अॅक्टिंग करून . अनुपम खेर यांची आई त्यांना म्हणाली,'जे तू आहेस तेच मी म्हणतेय. जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या डोक्यावर एकही केस नव्हता. मला माहित नाही असे कसे झाले. तुझ्या डोक्यावर मोजता येतील एवढेच केस होते. पण त्यासाठी मी काही देवाशी भांडू शकत नव्हते. मला तुला पहिल्यांदा पाहून आश्चर्यच वाटलं होतं'.

आईच्या या बोलण्यावर अनुपम यांनीही पटकन उत्तर दिलं की ,'तुझ्या सगळयाच भावांच्या डोक्यावर केस नव्हते. त्यांच्यामुळेच माझ्या डोक्यावरही केस नाही आले'. तर अनुपम यांच्या आईने त्यावर मिश्किलपणे म्हटलं ,'अरे वयोमानानुसार त्यांच्या केसांची गळती झाली. पण तुला जन्मतःच केस नव्हते'. पुढे त्या असंही म्हणाल्या,माझ्या जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावर केस नाहीत याचा मला थोडा आश्चर्यकारक धक्का बसला होता,आणि म्हणून माझ्या तब्येतीवर परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टरांनी बाळाला माझ्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. पण मी याला पूर्ण विरोध दर्शविला. आणि बाळ जसं आहे तसं आनंदाने स्विकारलं. ह्या व्हिडिओतील अनुपम खेर यांच्या आईने त्यांच्या केसांविषयी सांगितलेले किस्से मजेदार आहेत. अनुपम नेहमीच आपल्या आईसोबतचे मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात.

अनुपम खेर आई दुलारीसोबत

अनुपम खेर आता आपल्या सर्वांना लवकरच सिल्वर स्क्रीनवर भेटीस येत आहेत. दिग्दशर्क-निर्माता सुरज बडजात्या यांच्या सिनेमातून दिसणार आहेत. अमिताभ बच्चन, बोमन ईराणी, सारिका, डॅनी, परिणीती चोप्रा अशी मोठी स्टारकास्ट ह्या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT