Anupam Kher,Prakash Raj Google
मनोरंजन

Kashmir Files ला 'बकवास' म्हणाऱ्या प्रकाश राजवर अखेर अनुपम खेरचा पलटवार, अभिनेत्याची लायकी काढत म्हणाले..

काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी काश्मिर फाईल्सला अतिशय हीन शब्दात हिणवलं होतं. त्याला काही दिवसांनतर का होईना पण कडक उत्तर अनुपम खेरनी दिलं आहे.

प्रणाली मोरे

Anupam Kher: काही दिवसांपूर्वी बॉलीवूड आणि साऊथ सिनेमातही प्रसिद्ध असणारे प्रकाश राज यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्निर फाईल्स'ला प्रोपगैंडा सिनेमा संबोधत मीडियासमोर खूप नावं ठेवली होती. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता.

अर्थात,त्यावेळी प्रकाश राजला विवेक अग्निहोत्रीनं पलटवार करत उत्तर दिलं होतं हे वेगळं सांगायला नकोच. याच मुद्द्यावर नुकतंच एका कार्यक्रमात 'द काश्मिर फाईल्स' अभिनेता अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत तिखट भाष्य केलं आहे.(Anupam Kher Reacted to prakash raj who calls kashmir files is nonsense)

अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांच्या त्या काश्मिर फाईल्स संदर्भातील वक्तव्यावर बोलताना म्हटलं की, ''लोक आपल्या आपल्या अकलेची जेवढी कुवत तसं बोलतात. काही लोक आयुष्यभर खोटं बोलतात. काही लोक आयुष्यभर खऱ्याच्या मार्गावर चालतात. मी त्या लोकांपैकी आहे जो आयुष्यभर खरं बोलत आला आहे. ज्यांना खोटं बोलत आयुष्य काढायचं आहे ती शेवटी त्यांची मर्जी''.

प्रकाश राज यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या काश्मिर फाईल्स विरोधात बोलताना एका इव्हेंटमध्ये म्हटलं होतं की,''द काश्मिर फाईल्स बकवास सिनेमा आहे. पण आम्हाला माहित आहे याची निर्मिती कोणी केलीय...बेशरम कुठले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे परिक्षकही यांच्यावर थूंकतात आणि दिग्दर्शक अजून विचारतोय की सिनेमाला ऑस्कर का नाही भेटत. त्याला भास्कर पण नाही मिळणार. इथे एक संवेदनशील मीडिया उपस्थित आहे म्हणून सांगतो की हा एक प्रोपोगेंडा सिनेमा आहेटट.

प्रकाश राज यांच्या या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी देखील पलटवार करताना म्हटलं होतं की, ''द काश्मिर फाईल्सनं शहरी नक्षलवाद्यांची रात्रीची झोप अशी उडवली आहे की त्यांची एक पिढी वर्षभरानंतरही टेन्शनमध्ये राहिल. यांची पिढी आपल्याच मायबाप प्रेक्षकांनी टीका केल्यावर भुंकणारे कुत्रे संबोधते. अंधारराज..मी भास्कर कसा मिळवेन...ते तर तुमचं आहे...कायम राहील''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT