anupam kher on mahesh bhatt 
मनोरंजन

सुशांत प्रकरणात महेश भट्ट यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर अनुपम खेर यांनी दिली प्रतिक्रिया

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला दोन महिने पूर्ण झाले. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. 'एमएस धोनी' सिनेमात सुशांतच्या वडिलांची भूमिका साकरणारे अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रकरणात त्यांची प्रतिक्रिया दिला आहे. त्यांनी या प्रकरणात महेश भट्ट यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर त्यांच मत मांडलं आहे.

अनुपम खेर सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात सीबीआय तपासणी झाली पाहिजे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महेश भट्ट यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली. महेश भट्ट यांची स्तुती करत त्यांनी म्हटलंय की 'त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट दिला गेला पाहिजे. अनुपम यांनी म्हटलं ती ते तोपर्यंत असं करत राहतील जोपर्यंत ते दोषी सिद्ध होत नाहीत किंवा स्वतःहून पुढे येऊन याबाबत काही प्रतिक्रिया देत नाहीत.'

अनुपम यांनी यापुढे जाऊन असंही सांगितलं की, 'ते नेहमी आयुष्याशी संबंधित सल्ला घेण्यासाठी महेश भट्ट यांच्याकडे जातात. त्यांनी हे देखील सांगितलं की महेश भट्ट यांना त्यांच्या पाठिंब्याची गरज नाहीये. ते एक अशी व्यक्ती आहेत जे स्वतः त्यांची लढाई लढू शकतात. '

सुशांत मृत्यु प्रकरणात नुकतेच सीबीआयने सुशांतचे वडिल केके सिंह, बहीण आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील त्याच्या कुटुंबाच्यासोबत आहे. या प्रकरणात ईडू कडूनही तपास सुरु आहे.   

anupam kher reacts on allegations on mahesh bhatt in sushant singh rajput case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT