anupam kher 
मनोरंजन

'याचं उत्तर चंद्रावर राहणारेसुद्धा देतील'; 'सूर्यवंशम' दाखवणाऱ्या चॅनलला अनुपम खेर यांचं मजेशीर उत्तर

स्वाती वेमूल

बॉलिवूडचे अनेक चित्रपट टीव्हीवर प्रसारित केले जातात. त्यातही असे काही चित्रपट आहेत, जे वारंवार टीव्हीवर प्रसारित केले गेले असून प्रेक्षकांना त्यातील प्रत्येक संवाद आणि गाणी तोंडपाठ झाली आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 'सूर्यवंशम'. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्च यांच्या या चित्रपटाची चर्चा आजही होताना दिसते. कारण 'सेट मॅक्स' या वाहिनीने या चित्रपटाला अजरामर केलं. यावरून अनेक विनोद आणि मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतंच सोनी मॅक्स या वाहिनीने या चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न ट्विटरवर विचारला असता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मजेशीर उत्तर दिलंय. 

'हिरा त्याचे वडील ठाकूर भानु प्रताप सिंह यांचं मन जिंकू शकेल का', असा प्रश्न वाहिनीने विचारला. त्यावर अनुपम खेर यांना हसू अनावर झालं. या ट्विटला उत्तर देत त्यांनी लिहिलं, 'माझ्या प्रिय सोनी मॅक्स मूव्हीजवाल्यांनो, तुमचा हा प्रश्न वाचून मला हसू अनावर झालं. तुम्ही हा चित्रपट इतक्या वेळा दाखवला आहे की आता चंद्रावर राहणाऱ्या व्यक्तीलाही त्याचं उत्तर देता येईल. जय हो!'

सोनी मॅक्स वाहिनीवर हा चित्रपट अनेकदा प्रसारित केला जातो. यामागचं कारणसुद्धा अत्यंत रंजक आहे. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, त्याच वर्षी सेट मॅक्स हे चॅनल लाँच झालं होतं. आता सेट मॅक्सचं सोनी मॅक्स असं रुपांतर झालं आहे. या वाहिनीने सूर्यवंशम चित्रपटाचे १०० वर्षांचे राइट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा चित्रपट वारंवार प्रसारित केला जातो. सोनी मॅक्सच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT