anupam kher, kirron kher
anupam kher, kirron kher file photo
मनोरंजन

'तुम्हाला लाज वाटायला पाहिजे'; अनुपम खेर भडकले

प्रियांका कुलकर्णी

ज्येष्ट अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांना कॅन्सर झाला असून गेल्या काही दिवसांपासून त्या उपचार घेत आहेत. एप्रिलमध्ये अनुपम खेर यांनी किरण यांना मल्टीपल माइलोमा झाला आहे अशी माहिती दिली होती. मल्टीपल माइलोमा हा एक प्रकारे ब्लड कॅन्सर (Blood Cancer) सारखाच असतो. अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे पत्नी किरण यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. (anupam kher slams journalist who claim that he is changing colors because of kirron kher health)

अनुपम आणि किरण यांच्याबद्दल नुकतेच एका पत्रकारानं ट्विट केले होतं. या पत्रकाराला अनुपम खेर यांनी आपल्या भाषेत खडसावलं आहे. या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्या पत्रकाराचं नाव नम्रता जकारिया असं आहे.

काय होतं नम्राता जारियाचं ट्विट?

'अनुपम खेर सध्या सतत आपले रंग बदलत आहेत. यामागील कारण त्यांच्या पत्नीचं आरोग्य आहे. असं वाटतेय की, किरण खेर यांच्याऐवजी चंडीगढ मतदार संघात दुसऱ्या उमेदराला संधी देण्यात येणार आहे. आजारपणामुळे किरण खेर यांना आपली सीट सोडायला सांगण्यात आली आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे'. नम्रताने या ट्विटसोबत #BJP असा हॅशटॅग वापरला आहे.

अनुपम खेर काय म्हणाले?

'नम्रता जकारियासारखे लोक कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. ती किरणच्या आरोग्याविषयी असंवेदनशील आहे आणि या परिस्थितीचा फायदा घेत आहे. एका गिधाडासारखी अपेक्षा पुर्ण करू इच्छीते. तुला लाज वटायला पाहिजे.'

अनुपम खेर यांनी पत्रकाराला खडसावल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. अनुपम खेर यांचं हे ट्विट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी पत्रकार नम्राता जारिया हिला ट्रोल करत टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT