Anupam Kher speaks on 'KAALI Controversy',tweet viral Google
मनोरंजन

'जय काली कलकत्तेवाली..'; 'काली' च्या दिग्दर्शिकेला अनुपम खेरनी फटकारलं?

दिग्दर्शिका लीना मणिमेकलई आपल्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवरनं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्वच स्तरावरनं दिग्दर्शिकेवर टीकेची झोड उठत आहे.

प्रणाली मोरे

दिग्दर्शिका लीना मणिमेकलई(Leena Manimekalai) आपल्या 'काली'(KAALI) सिनेमाच्या पोस्टरवरनं सध्या वादग्रस्त चर्चेत आहे. सोशल मीडियावर लीनाला नेटकऱ्यांनी खूप खरी-खोटी सुनावली आहे. जवळपास सर्व राजकीय पक्ष तिच्याविरोधात उभे राहिलेयत. त्यातच आता अभिनेता अनुपम खेर यांनी देखील एक इंट्रेस्टिंग ट्वीट केलं आहे.(Anupam Kher speaks on 'KAALI Controversy',tweet viral)

अनुपम खेर यांनी ट्वीटरवर मां कालीचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं आहे,''शिमलामध्ये एक प्रसिद्ध मां कालीचं मंदिर आहे. कालीबाडी. लहानपणी मी अनेकदा तिकडे जायचो. बूंदीचा प्रसाद आणि गोड पंचांमृताचा लाभ घेण्यासाठी खास, मंदिराच्या बाहेर एक साधू-फकीर सारखा एक बाबा सारखं म्हणायचा,जय मां कलकत्तेवाली...तेरा श्राप ना जाये खाली. आजकाल मला त्या साधुची आणि मंदीराची खूप आठवण येतेय''.

अनुपम यांच्या त्या ट्वीटनंतर बोललं जात आहे की त्यांनी लीना आणि तिच्या सिनेमाविरोधातच हा इशारा दिला आहे. लीना मणिमेकलईनं आपल्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवर काली मां चा पेहराव केलेल्या अभिनेत्रीला सिगारेट ओढताना दाखवलं आहे. फोटो मध्ये मां कालीच्या हातात त्रिशूळ तर आहेच पण LGBTQ कम्युनिटीचा झेंडा देखील आहे.

'काली'चा हा पोस्टर समोर आल्यावर सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं आहे. लीनाला अटक करण्याची मागणी केली जातेय. लीनाचं ते पहिलं वादग्रस्त ट्वीट सोशल मीडियावरुन ट्वीटरनं डिलीट केलं आहे. दिल्ली,युपी,मुंबईत लीना विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. लीना मणिमेकलईचं आता म्हणणं आहे की,'ती कुठेच सुरक्षित नाही'. तिनं एक ट्वीट करत लिहीलं आहे की,'मला वाटतंय पूर्ण देश माझ्या विरोधात गेलं आहे'.

अभिनेता अशोक पंडित आणि सेन्सॉर बोर्डाचे मुख्य पद भूषविलेले पहलाज निहलानी यांनी या वादग्रस्त प्रकरणावर बोलताना सिनेमाला सर्टिफिकेट देताना कोणत्या कठीण परिस्थितीतून जावं लागतं याचा पाढाच वाचला होता. अशोक पंडित म्हणाले,''कोणत्याही सिनेमाला रिलीज होण्याआधी सेन्सॉरचं परवानगी पत्र लागतंच. पण फिल्म फेस्टिव्हलची गोष्ट वेगळी आहे''. तर पहलाज यांनी सांगितलं आहे की,''इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमांना स्वातंत्र्य दिलं जातं. म्हणजे सिनेमे तिथल्या स्टॅंडर्डला मॅच करतील. आणि याचाच फायदा मग बरेच फिल्ममेकर्स उचलतात. स्वातंत्र्याच्या व्याख्या मग ते आपल्या मनाप्रमाणे लावतात''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT