Anupam Kher(The Kashmir Files) Google
मनोरंजन

The Kashmir Files:'सत्य जाणून घेतलात तर..'अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एका ट्वीटच्या माध्यमातून लोकांना सिनेमा पहायचं आवाहन केलं आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर(Anupam Kher) सध्या 'द काश्मिर फाईल्स'(The kashmir Files) या त्यांच्या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा १९९० साली काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. भारतभरात या सिनेमाची जोरदार प्रशंसा केली जात आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या देखील पसंतीस उतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमा पाहिल्यानंतर 'द काश्मिर फाईल्स'शी जोडल्या गेलेल्या सर्व टीमचं तोंडभरून कौतूक केलं. ते म्हणाले,''१९९० साली काश्मिरी पंडितांसोबत जे दृष्कृत्य झालं त्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे''. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी केलेल्या कौतूकासाठी आता सिनेमातील अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतानाच त्यांची प्रशंसा देखील केली आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अनुपम खेर यांनी या व्हिडीओत नरेंद्र मोंदी यांनी सिनेमा पाहून कौतूक केल्यासाठी आभार मानले आहेत. अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळतात. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खूप चांगल्या पोस्ट शेअर करताना दिसतात. अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाची प्रशंसा केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिलं आहे,''सत्य योग्य पद्धतीनं देशासमोर आणलं तर त्यात देशाचेच भले असते. आमचा सिनेमा का पहायला हवा! द काश्मिर फाईल्स वर मनोगत व्यक्त करण्यासाठी मोदीजी आपले धन्यवाद. हा सिनेमा काश्मिरी हिंदूच्या नरसंहारामागचं सत्य कथन करतो''. अनुपम खेर यांच्या ट्वीट एकच गोष्ट सूचित करत आहे ते म्हणजे काश्मिरमधील त्या नरसंहारामागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर सिनेमा पहा.

सोशल मीडियावर अनुपम खेर यांचं हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. अनुपम खेर यांच्या चाहत्यांनीच नाही तर सर्वच नेटकऱ्यांनी त्यांच्या या ट्वीटला पसंती दर्शवली आहे. तसंच,प्रत्येकानं प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. द काश्मिर फाईल्स'सिनेमा ११ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापासून सिनेमा चर्चेत आहे. देशातील अनेक राज्यात सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT