Anupamaa fame Rupali Ganguly  Esakal
मनोरंजन

Rupali Ganguly: 'लठ्ठ बाई, आंटी दिसतेय',जेव्हा अनुपमा फेम रूपाली गांगुली झाली होती बॉडी शेमिंगची शिकार...

Vaishali Patil

रुपाली गांगुली हे टिव्हि विश्वातलं खुप लोकप्रिय आणि चर्चेतलं नाव आहे. रुपालीने आता पर्यंत डॉ. सिमरन, मोनिशा साराभाई आणि पिंकी यांसारख्या लोकप्रिय भुमिका साकरल्या आहेत. आता ती सध्या अनुपमाच्या भूमिकेतुन चाहत्यांची मने जिंकत आहे.

सात वर्षांच्या ब्रेकनंतर रुपाली गांगुली 'अनुपमा'सोबत टेलिव्हिजनवर परतली आणि तिने तिची जादू पुन्हा दाखवली. 'अनुपमा' शो सध्या खूप चर्चेत आहे. हा शो त्याच्या आगामी ट्रॅकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र लोकांची मने जिंकने हे रुपालीसाठी इतक सोपं नव्हत. आता अलीकडेच रुपालीने खुलासा केला आहे की ती लोकांकडून बॉडी शेमिंगची कशी शिकार झाली होती.

रुपालीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. मात्र, सध्याच्या अनुपमा मालिकेच्या ट्रॅकमुळे तिला सोशल मीडियावर अनेक ट्रोलचा सामना करावा लागला आहे, ज्याला तिने चोख प्रत्युत्तरही दिले आहे. मात्र यामुळे रुपालीला आता पुन्हा एकदा तिचा भुतकाळ आठवला जेव्हा लोक तिला जाड म्हणत ट्रोल करायचे.

रुपालीने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉडी शेमिंगवर भाष्य केलं आणि सांगितले की रुपाली म्हणाली की ती कधीच करिअर ओरिएंटेड नव्हती. ती स्वतःला फ्लोटर समजायची. तिला कोणतीही महत्वाकांक्षा नव्हती. तिला फक्त लग्न आणि मुलं हवी होती. तिची एकच इच्छा होती आणि तिला त्याचा खूप अभिमान आहे. ती सांगते की तिला गृहिणी व्हायचं होतं.

रुपाली पुढे म्हणाली, 'एवढी मोठी स्टार होण्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता'. रुपालीने तिच्यासोबत झालेल्या बॉडी शेमिंगवर मौन तोडले आणि म्हणाली, लोक मला म्हणायचे, अरे तू मोनिशा आहेस ना, इतकी जाड झाली आहेस.'

पुढे ती म्हणते, 'माझी एक अभिनेत्री मैत्रीण मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली, 'अरे तू तो आंटी बन गई'. कोणी कितीही चांगलं बोललं तरी त्याचा तुमच्यावर मानसिकदृष्ट्या खूप वाईट परिणाम होतो. लोक काहीही म्हणाले तरी त्यांना तुम्हाला आंटी किंवा जाड म्हणण्याचा अधिकार नाही.'

टीव्हीवर परतल्याविषयी रुपाली म्हणाली, 'माझं एक उद्दिष्ट होतं आणि ते म्हणजे प्राणी आणि वृद्धांसाठी घर बांधणे. आधी मला घर चालवायला आणि नंतर प्राण्याच्या आश्रयासाठी पैशाची गरज होती आणि मला अभिनयाची जाण असल्यामुळे मी ते करायचं ठरवलं आणि आज मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT