Nitesh Pandey Death Esakal
मनोरंजन

Nitesh Pandey Death: 'अनुपमा' फेम अभिनेत्याचा हृदयविकाराने मृत्यू...

Vaishali Patil

टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या केवळ 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'अनुपमा' प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

त्याच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी यापूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे.

वृत्त संस्थेशी बोलतांना सिद्धार्थ नगर यांनी सांगितले की, नितीश एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी मिळाली, नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मात्र, मृतदेह केव्हा आणण्यात आला आणि अंत्यसंस्कार केव्हा होणार याबाबत त्यांना फारशी माहिती नाही.

नितीश पांडे यांचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. नितेश पांडे यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. 'ओम शांती ओम' या चित्रपटातही त्यानी शाहरुख खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती.

यासह, ते 'बधाई दो', 'रंगून', 'हंटर', 'दबंग 2', 'बाजी', 'मेरे यार की शादी है', 'मदारी' आणि 'खोसा का घोसला' यांसारख्या इतर अनेक चित्रपटांच्या माध्यमातुन त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केले.

त्याबरोबरच ते दिशा परमार आणि नकुल मेहता स्टारर शो 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT