Rupali Ganguly  Esakal
मनोरंजन

Rupali Ganguly: काही मागायला नाय तर... उज्जैन महाकालच्या भस्म आरतीमध्ये तल्लीन झाली 'अनुपमा'!

आज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली उज्जैन बाबा महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभागी झाली होती.

Vaishali Patil

Rupali Ganguly at Mahakaleshwar Temple:  टिव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो म्हणजे 'अनुपमा'. या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात पोहचली. तिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे.

आज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली उज्जैन बाबा महाकालच्या भस्म आरतीमध्ये सहभागी झाली होती. आरतीनंतर रुपालीने गर्भगृहात जाऊन महाकालचे आशीर्वाद घेतले. सध्या रुपालीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

एएनआयने सोशल मीडियावर रुपालीचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती भक्तांसह बाबा महाकालच्या भक्तीत तल्लीन झाली. रुपालीने देवाचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचे आभार मानले.

आज सकाळी रूपाली गांगुली भगवान महाकालच्या मंदिरात पोहोचली होती. तिथे तिने 'भस्म आरती'मध्ये भाग घेतला आणि भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले. याआधीही 2023 मध्ये रुपाली गांगुली उज्जैनला गेली होती.

यावेळी मिडियासोबत बोलताना रुपालीने सांगितले की, ती महाकालच्या दर्शनासाठी अनेकदा गेली आहे. त्याच्या आशिर्वादानेच तिला तिच्या क्षेत्रात यश मिळाले आहे. ती महादेवाची मोठी भक्त आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, '2020 मध्ये मी पहिल्यांदा इथे आले आणि इथेच मला 'अनुपमा' या मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली. आता मी महादेवाकडे काही मागायला नाही तर त्यांचे आभार मानायला आली आहे.'

त्यानंतर रुपालीने इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये तिचा एक फोटो शेयर केला ज्यात तिने कॅप्शनमध्ये जय महाकाल असे लिहिले होते.

रुपाली गांगुली एक उत्तम अभिनेत्री आणि थिएटर कलाकार आहे. 'अनुपमा' या मालिकेपूर्वी 'सारा भाई वर्सेस सारा भाई' या मालिकेत दिसली होती. आता रुपालीला बरेच लोक अनुपमा या नावाने ओळखतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक

Nashik Crime : खुनांचा आकडा ४३ वर! नाशिकमध्ये विधीसंघर्षित बालकांकडून घातक हल्ले; पोलीस आणि गुन्हेगारांच्या हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह

Anil Parab: मृत्यूनंतर खरंच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले? अनिल परबांनी फोटो दाखवत कदमांची बुद्धी काढली

SCROLL FOR NEXT