Anurag Kashyap daughter  
मनोरंजन

अनुराग कश्यपच्या मुलीवर भडकले नेटकरी

ड्रग्ज, प्रेग्नंसीबाबत वडिलांना विचारले होते प्रश्न

स्वाती वेमूल

निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या व्हिडीओंमुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आलियाने तिचा व्लॉग पोस्ट केला होता. यामध्ये ती तिच्या वडिलांना विविध प्रश्न विचारताना दिसतेय. मात्र याच व्हिडीओमुळे नंतर तिला नकारात्मक प्रतिक्रियांचा, ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'आस्किंग माय डॅड ऑकवर्ड क्वेश्चन्स' या व्हिडीओ सेशनमध्ये आलियाने अनुराग कश्यपला काही प्रश्न विचारले होते. गर्भधारणा, बॉयफ्रेंड, ड्रग्ज आणि अडल्ट चित्रपट पाहण्यावरून हे प्रश्न विचारले होते. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Anurag Kashyap daughter Aaliyah on receiving hate for talking pregnancy drugs with dad slv92)

व्हिडीओवरून ट्रोलिंग झाल्यानंतर आलियाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. या चॅट शोमध्ये आलियाने लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांविषयी सांगितलं. 'वडिलांसोबत अशा गोष्टी बोलल्यामुळे मला नेटकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. माझ्या युट्यूब चॅनेलवर लोक काय पाहण्यासाठी आले हे माहित नाही. पण मला खूप द्वेषाचा सामना करावा लागत आहे. तू तुझ्या पालकांशी अशा गोष्टी कशा बोलू शकते, तुला लाज वाटत नाही का, असे कमेंट्स लोकांनी केले आहेत', असं ती म्हणाली.

'आस्किंग माय डॅड ऑकवर्ड क्वेश्चन्स' या व्हिडीओ सेशसनमध्ये आलियाने तिच्या वडिलांना म्हणजेच अनुराग कश्यपला विचारले होते की, जर मी प्रेग्नंट आहे असं सांगितलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? यावर अनुरागने उत्तर दिले, 'तुला आई व्हायचं असेल तर मी नेहमीच तुझ्यासोबत असेन.' आलिया कश्यप सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून बॉयफ्रेंड शेन ग्रेगोअरसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT