Anurag Kashyap does not want to work with Ranbir Kapoor  esakal
मनोरंजन

Anurag Kashyap: 'आता मला पुन्हा रणबीरसोबत काम करायचं नाही'! अनुराग कश्यप असं का म्हणाला?

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटानं आता प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. त्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Anurag Kashyap does not want to work with Ranbir Kapoor : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटानं आता प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. त्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाईही केली आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्याचे कौतुक केले असून प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपनं रणबीरवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

एका मुलाखतीच्या वेळी अनुरागला असे विचारण्यात आले की, तुला रणबीरसोबत दुसऱ्यांदा काम करायला आवडेल का, त्यावर तो म्हणाला की, तो एक प्रसिद्ध कलाकार आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्यासोबत काम करायला कोण नाही म्हणेल. इंडस्ट्रीतील अनेकजण त्याच्याबरोबर काम करायला उत्सुक आहे. ज्याच्याजवळ जास्त चाहते त्याच्यासोबत दिग्दर्शक काम करतातच.

माझ्याकडे एखादा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल असा कोणताही फॉर्म्युला नाही. त्यामुळे मी त्याला आणि त्याच्या अभिनयाला न्याय देऊ शकेल का असा माझ्या मनात प्रश्न आहे. अशा शब्दांत अनुरागनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुरागनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आपली लोकं चित्रपटांमध्ये काही प्रयोग करायला मागत नाही. त्यामुळे त्यामध्ये तोचतोचपणा येतो आहे. प्रेक्षकांना नेहमीच प्रयोगशीलता आवडते. त्याला ते दाद देतात. नाहीतर मग त्यांच्याकडून टीका वाट्याला येते. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टारसोबत काम करता तेव्हा तुमच्यापुढे अनेक आव्हानं असतात. हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. बॉक्स ऑफिसवर एखाद्या चित्रपटाचा हिट फॉर्म्युला वेगवेगळ्या गोष्टींनी ठरतो. मला ते जमलेच असे नाही.

अनुराग कश्यपनं संदीप रेडडी वांगाच्या अॅनिमलचे कौतुक केले आहे. त्यातील रणबीरच्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर देखील त्या मुलाखतीनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. याविषयी अॅनिमलच्या मेकर्सनं म्हटलं आहे की, येत्या काळात हा चित्रपट जगभरातून ५५० कोटी रुपयांचा बिझनेस करेल. अशा प्रकारे हिंदी चित्रपट विश्वात हा चित्रपट मोठी कमाई करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT