Anurag Kashyap Manjummel Boys review  esakal
मनोरंजन

Anurag Kashyap : 'बॉलीवूड अजुन खूपच मागे, ते फार तर रिमेक करु शकतात..'; मल्याळम सिनेमे पाहून अनुरागची प्रतिक्रिया

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुरागनं पुन्हा एकदा बॉलीवूडच्या चित्रपटांवर तोफ डागली आहे.

युगंधर ताजणे

Anurag Kashyap Director praised Manjummel Boys : बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि आपल्या हटके स्टोरीटेलिंगसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक कोणता असे म्हटले तर त्यात अनुराग कश्यपचे नाव येते. भारतातील युवा पिढीचा आवडता दिग्दर्शक म्हणून त्याची वेगळी छाप आहे. गुलाल, देव डी, गँग्स ऑफ वासेपूर, सिक्रेड गेम्स सारख्या त्याच्या कलाकृती नेहमीच चर्चेचा विषय असतात.

अनुराग हा जसा त्याच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो तसाच तो (Manjummel Boys Movie News) त्याच्या परखड वक्तव्यांसाठी देखील चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. आपल्याला जे योग्य वाटते ते स्पष्ट शब्दांत सांगणाऱ्या अनुरागला नेटकरी त्याच्याविषयी काय बोलतात, आपण ट्रोल होत आहोत याबाबत त्याला कसलीही चिंता नसते. आता त्यानं पुन्हा एकदा बॉलीवूड, बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते यांच्याविषयी परखड शब्दांत वक्तव्य केलं आहे.

त्याचं झालं असं की, अनुरागनं मल्याळम चित्रपट मंजुमेल बॉईजचा रिव्ह्यु (Anurag Kashyap Director praised Manjummel Boys review) केला आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसनं सविस्तर वृत्तही दिलं आहे. यावेळी त्यानं ज्या सडेतोडपणे बॉलीवूड आणि बॉलीवूडची स्टोरी लाईन यावर आगपाखड केली आहे. तो म्हणतो, बॉलीवूड अजुनही खूप मागे आहे. त्यांनी केवळ रिमेक तयार करावेत. मी आता मंजुमेल बॉईज नावाचा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून माझी खात्री झाली की, बॉलीवूड रिमेकच तयार करु शकते. तशा धाटणीचा चित्रपट नाही.

गेल्या महिन्यात या चित्रपटानं जगभरातून शंभर कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली होती. मंजुमल बॉईज हा मित्रांच्या टोळक्याची गोष्ट आहे. ते सगळे जण सुट्टीच्या निमित्तानं कोडिकाईनालला जाण्याचा निर्णय घेतात. मात्र तिथं गेल्यानंतर जे काही घडतं ते सारं चक्रावून टाकणारं आहे. दिग्दर्शकानं मोठ्या प्रभावीपणे त्याचा मेसेज हा प्रेक्षकांपर्यत पोहचवला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

दुसरीकडे अनुरागनं यावेळी ब्रम्हयुग नावाच्या मल्याळम चित्रपटाची देखील स्तुती केली आहे. तो म्हणतो या चित्रपटांनी हिंदी चित्रपटाला केव्हाच मागे सोडले आहे. हे चित्रपट जबरदस्त आहेत. अशा शब्दांत त्यानं त्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मुख्य चित्रपट प्रवाहात या चित्रपटांनी मोलाची भर टाकली असून येत्या काळात त्यांनी बॉलीवूडसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं अनुरागनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, सिक्रेट सर्विसने वाचवला जीव; हल्लेखोर ताब्यात, VIDEO VIRAL

Mumbai Politics: मराठी रिक्षाचालकांना अडवल्यास फोडून काढू: अमित ठाकरेंचा परप्रांतीय आंदोलकांना इशारा, अन्यथा रस्त्यावरच मार खाल!

Rahul Gandhi: ममता बॅनर्जींची गरिबांऐवजी श्रीमंतांना मदत: राहुल गांधी, ‘देशभक्त’ मोदींकडून देशाचीच विक्री!

IPL 2026: तासाभरातच वैभव सूर्यवंशीकडून अभिषेक शर्माने हिरावली Orange Cap; शर्यतीत टॉप-५ फलंदाज कोण?

विकेंडला बनवा कॅफे-स्टाइल झटपट क्रीमी एग सँडविच; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल

SCROLL FOR NEXT