Anurag Kashyap recalls news Google
मनोरंजन

Anurag Kahsyap: देशात सध्या भीतीचं वातावरण! अनुराग का म्हणाला असं?

सध्या बॉलीवूडमध्ये जे काही सुरु झाले आहे त्यावरुन अनुरागनं प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

युगंधर ताजणे

Anurag Kashyap News: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता म्हणून अनुराग कश्यप यांचे नाव घेतले जाते. बॉलीवूडमध्ये आपल्या दर्जेदार कलाकृतींसाठी अनुरागचं नाव नेहमीच जाणकार प्रेक्षक, समीक्षक आणि अभ्यासक यांच्या तोंडी (Bollywood Movie) असतं. सध्या बॉलीवूडमध्ये जे काही सुरु झाले आहे त्यावरुन अनुरागनं प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनुरागनं आपल्याला आताच्या वातावरणता जर गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur) सारखा चित्रपट तयार करायला सांगितला तर मला तो जमणार नाही. माझ्याकडे दोन ते तीन चित्रपटांच्या स्क्रिप्ट रेडी आहेत मात्र त्या राजकारण, धर्म यावर आधारित असल्यानं मला ते तयार करता येतील की नाही याबद्दल शंका आहे.

बॉलीवूडमध्ये आमिरच्या लाल सिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर (boycott bollywood) बॉयकॉटचा शिक्का मारला गेला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीकाही केली जात आहे. आमिरनं त्यासाठी माफीही मागितली आहे. माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यासाठी नेटकऱ्यांची माफी मागतो. असे त्यानं म्हटले आहे. मात्र नेटकरी अजुनही ऐकायला तयार नाहीत. शेवटी ज्यांना वाटतं त्यांनी तो पाहावा, आता ज्यांनी ठरवलचं आहे की पाहायचा नाही तर त्यांना मी काय बोलू...असा प्रश्न आमिरनं विचारला आहे. या परिस्थितीवर अनुरागनं प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलीवूड बॉयकॉट कल्चरवर अनुरागनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. ब्लॅक फ्रायडे, देव डी, गुलाल, गॅग्स ऑफ वासेपूर सारखे चित्रपट तयार करणाऱ्या अनुरागचा आता दोबारा नावाचा चित्रपट येतो आहे. त्यात तापसी प्रमुख अभिनेत्री आहे. अनुरागनं त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीविषयी तो म्हणतो... मला राजकीय, धार्मिक चित्रपट तयार करायचा म्हणजे भीतीच वाटते.

लोकं काही गोष्टींना घाबरतात त्यामुळे आमच्या सारख्या निर्माते आणि दिग्दर्शकाला मोठया अडचणीला सामोरं जावं लागतं. तुम्हाला जर आजुबाजुच्या परिस्थितीविषयी सांगायचे आहे तर तुम्ही कसे सांगणार हा माझ्यापुढे प्रश्न आहे. 2020 मध्ये सुशांतनं आत्महत्या केली. त्याच्याविरोधात अजुनही न्याय मागण्यासाठी सोशल मीडियावर सुशांतच्या नावाचा ट्रेंड सुरु आहे. आता तर बॉलीवूड बॉयकॉट करण्याविषयी लोकं बोलू लागली आहेत. तुम्हाला जर बॉयकॉट केलं जातं याचा अर्थ तुम्ही कोणीतरी स्पेशल आहात. लोकं काहीही करतात. त्यांना वाटलं बॉयकॉट करायचं की लगेच तसा हॅशटॅग तयार केला जातो. आणि त्यावरुन संबंधित सेलिब्रेटीला ट्रोल केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT