Anurag Kashyap with daughter aliyah kashyap
Anurag Kashyap with daughter aliyah kashyap Google
मनोरंजन

Anurag Kashyap: एकेकाळी मुलींना ध्रुमपान करताना पाहून टोकायचा अनुराग कश्यप, पण आता स्वतःच्याच मुलीमुळे..

प्रणाली मोरे

Anurag Kashyap: अनुराम कश्यप लवकरच आपल्या नेहमीच्या धाटणीतील सिनेमांपेक्षा टोटल वेगळी अशी लव्ह स्टोरी घेऊन भेटीस येत आहे. 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहबब्बत' मध्ये अनुरागनं टीनएअजर्सच्या आयु्ष्यात रिलेशनशीपवरनं होणाऱ्या गोंधळावर आणि त्याच्यावरील सोल्युशनवर भाष्य केलेलं आहे.

अनुरागचं म्हणणं आहे की त्यानं हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं बनवला आहे. अनुरागनं एका मुलाखतीत या सिनेमाविषयी आणि आपल्या मुलीसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं संवाद साधला.

आपल्या सिनेमाविषयी अनुराग कश्यप म्हणतो-''माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे. खूप लोकांना वाटेल की अनुराग तर काय लव्ह स्टोरी घेऊन आला आहे,जे खरं नाहीय. मी या सिनेमातून जे सांगू इच्छित आहे ती खूप वेगळी गोष्ट आहे''.

'' ही कहाणी फक्त टीनएजर्सची नाही तर माझ्या पिढीतील लोकांच्या मनातील भावना देखील मला या गोष्टीतून सांगायच्या आहेत .जेव्हा मी मोठा होत होतो,तेव्हाचं वातावरण खूप वेगळं होतं. त्यासाठी आपल्या धर्मापासून वेगळं होऊन गोष्टी करायची गरज नव्हती''.

''माझी आजी पूजापाठ करायची. घरी अंड खायची-शिजवायची परवानगी नव्हती. जे घरी जेवण बनायचं तेच आम्ही खायचो. पण मी पक्का मांसाहारी होतो,तेव्हा घराच्या बाहेर अंगणात एक वेगळं भांडं होतं. ज्यात वडील आमच्यासाठी मांस-मच्छी शिजवायचे. या आमच्या घरातील सीनचा मी 'मुक्काबाज'मध्ये वापर केला आहे''.

अनुराग पुढे म्हणाला-''त्यावेळी आम्ही मांसाहार केला की हात स्वच्छ धुऊन घरात प्रवेश करायचो. आमची भांडी वेगळी असायची. तेव्हा त्याची कोणाला अडचण व्हायची नाही. आजी आणि तिचा देवावरचा विश्वास याचा आम्ही आदर करायचोटट.

''आणि ती देखील आम्हाला मांसाहार करण्यापासून थांबवायची नाही. पण आज अशी वेळ आली आहे की आजच्या आजी या सगळ्या गोष्टींवर बंधनं आणतील. आजी म्हणेल,इथे खाऊ नका..आणि आजची पिढी म्हणेल,आम्ही तर इथेच खाणार''.

''आपण एकमेकांचा आदर करणं विसरलो आहोत. पहिलं आपण जगा आणि जगू द्या वर विश्वास ठेवायचो. पण आता गोष्टी थेट आर या पार पर्यंत पोहोचल्या आहेत''.

याच मुलाखतीत मुलीसोबतच्या नात्यावर अनुराग म्हणाला,''एक दिवस माझी मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली,बाबा तू अपराधी भावनेनं जगत आहेस. तुझ्या पालकांनी लोकांकडून पैसे उधारीवर घेऊन तुझ्या शिक्षणावर खर्च केले,खरंतर तुला सिनेमात इंट्रेस्ट होता तेव्हा''.

'' तुला त्यांना आपली मतं पटवून द्यायची होती. तो तुझा स्ट्रगल होता. आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुला लवकरात लवकर नाव कमावून पैसे कमवायचे होते. आता माझी मुलगी कॉलेज ड्रॉपआऊट झाली आहे, मी काळजीच्या स्वरात तिला विचारलं की,बाळा,तुझा आता काय करायचा विचार आहे?''

तेव्हा ती म्हणाली,''काय करणार म्हणजे,कॉलेजमधून ड्रॉपआऊट झाली आहे फक्त. आणि ते माझं टेन्शन नाही. माझा स्ट्रगल सुरु आहे की मला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे. मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत आहे की मी युट्युबच्या माझ्या व्यवसायात खूश आहे''.

'' युट्युबर बनणं मला आनंद देत आहे. तुला तर यात आनंद वाटला पाहिजे की मी खूश आहे. तुला सुरक्षित वाटावं म्हणून माझं आयुष्य तुझ्या कंट्रोलमध्ये का घेण्याचा प्रयत्न करत आहेस बाबा?''.

अनुराग कश्यपला एकदम कूल डॅडी म्हणून इंडस्ट्रीत ओळख आहे. दिग्दर्शक यावर म्हणाला,जेव्हा लोक येऊन मला सांगतात की तुझ्या मुलीचा व्हिडीओ युट्युबवर पाहिला. तू खूपच कूल डॅड आहे. मी कूल डॅड बनलो आहे,कारण तसं मला माझ्या मुलीनं बनवलं आहे, मी तोच मुलगा आहे ज्यानं त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षी एका मुलीला कॉलेजमध्ये सिगारेट पिताना पाहून टोकलेलं''.

''मी असा होतो. आज त्यामुळेच मला कूल डॅड बनण्यासाठी खूप वेळ लागला. तुमच्या आयुष्यात असे लोक हवेत जे तुम्हाला बदलतील. जे तुमच्या गोष्टी पॉइंटआऊट करतील. मुली ज्या पद्धतीनं वडलांना काही गोष्टी समजावून सांगतात तसं कुणी दुसरं नाही करू शकत''.

''माझी मुलगी मला प्रत्येक गोष्टीवर टोकते. तिच्यामुळे मी कधी घराच्या भिंतीचा रंग कधी घरातलं टॉयलेट्सचं रुपडं सगळं रातोरात बदललं आहे. का तर ती तिची पसंती आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT