anurag kashyap and saharaa karimi 
मनोरंजन

'आमची मदत करा..'; अनुराग कश्यपने शेअर केलं अफगाणिस्तानच्या दिग्दर्शिकेचं पत्र

पत्रात मांडलं अफगाणिस्तानमधील भयाण वास्तव

स्वाती वेमूल

तालिबानी Taliban बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानावर Afghanistan ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अफगाण चित्रपट निर्माती सहारा करीमी Sahraa Karimi यांनी जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने Anurag Kashyap शेअर केलं असून सोशल मीडियावर त्या पत्राला अधिकाधिक शेअर करण्याची विनंती नेटकऱ्यांना केली आहे.

सहारा करीमी यांनी पत्रात मांडलं भयाण वास्तव

'माझं नाव सहारा करीमी.. मी चित्रपट दिग्दर्शिका आणि अफगाण फिल्म या कंपनीची संचालक आहे. १९६८ साली स्थापित झालेली ही एकमेव सरकारी मालकीची फिल्म कंपनी आहे. अत्यंत निराश होऊन मी फक्त या एका अपेक्षेने हे पत्र लिहित आहे की तुम्ही माझ्या सुंदर देशाला तालिबानपासून वाचवू शकाल. तालिबानने गेल्या काही दिवसांत कई राज्यांवर ताबा मिळवला आहे', असं त्यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलं. तालिबानने कशाप्रकारे आपली दहशत पसरवली आहे, याची काही भयानक उदाहरणे त्यांनी या पत्रात सांगितली.

'तालिबानने इथे नरसंहार केला, अनेक मुलांचं अपहरण केलं, कपड्यांवरून एका महिलेला ठार मारलं, त्यांनी कॉमेडियन्सवर अत्याचार करून त्यांना मारलं, सरकारशी संबंधित व्यक्तींचा त्यांनी जीव घेतला, आमच्यापैकीच काही जणांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली', असं त्यांनी पुढे लिहिलं. 'देशावर इतकं मोठं संकट असताना संपूर्ण जग शांत आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तालिबान सर्व कलांवर बंधनं आणेल आणि इतरही निर्माते, दिग्दर्शक त्यांच्या हिटलिस्टवर आहेत,' हे सांगताना त्यांनी मदतीची विनंती केली आहे.

तालिबानमुळे मुलींच्या शिक्षणावर कशाप्रकारे परिणाम झाला आहे, याचं वास्तव त्यांनी या पत्रात मांडलं. 'गेल्या काही दिवसांत तालिबानने अनेक शाळा उद्ध्वस्त केल्या आहेत आणि २० लाखांहून अधिक मुलींना शाळेतून काढून टाकलं आहे. या परिस्थितीविषयी जगात इतकं मौन का बाळगलं जातंय हे मला माहित नाही. पण मी माझ्या देशासाठी नक्की लढणार. मी हे एकटं नाही करू शकत. मला तुमच्या मदतीची गरज आहे. आपापल्या देशातील माध्यमांमध्ये अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीची वृत्त देऊन आमचा आवाज पोहोचवा', अशी विनंती त्यांनी केली.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील हरित ऊर्जेच्या पुरवठ्यात वाढ, टाटा पॉवरचा तीन कंपन्यांसोबत करार

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

SCROLL FOR NEXT