anurag worlikar and malvika engagement with their partners SAKAL
मनोरंजन

एकाच दिवशी दोन कलाकारांनी पार्टनरसोबत केला साखरपुडा

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या पार्टनरसोबत केला साखरपुडा

Devendra Jadhav

सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरु आहे. काहीच दिवसांपुर्वी अमृता देशमुख - प्रसाद जवादेने एकमेकांशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची खुप चर्चा झाली.

आता एकाच दिवशी मनोरंजन विश्वातील दोन लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या पार्टनरसोबत साखरपुडा केला आहे. ते म्हणजे दे धमाल फेम लोकप्रिय अभिनेता अनुराग वरळीकर. आणि कभी खुशी कभी गम मधील छोटी करीना म्हणजेच अभिनेत्री मालविका राज.

(anurag worlikar and malvika engagement with their partners)

अनुरागने गुपचुप केला साखरपुडा

अनुरागने त्याची गर्लफ्रेंड पायल साळवीसोबत साखरपुडा केला आहे. अनुराग आणि पायल हे गेल्या अनेक वर्षांपासुन रिलेशनशीपमध्ये असल्याचं समजतंय.

अनुरागने सोशल मीडियावर साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिलीय. अभिनेत्री स्पृहा जोशीने सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे!! congratulations अशी कमेंट करत अनुरागला शुभेच्छा दिल्यात.

अनुरागला आपण देवकी, बारायण या सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अनुरागने बालकलाकार म्हणुन दे धमाल मालिका गाजवलीय.

कभी खुशी कभी गम मधील छोट्या करीनाने केला साखरपुडा

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' मधली छोटी करीना तुम्हाला आठवते का? होय, आम्ही बोलत आहोत मालविका राज बद्दल. अभिनेत्री मालविकाने प्रणव बग्गासोबत साखरपुडा केला आहे. मालविकाने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

रवीना टंडन, भाग्यश्री, जॅकी श्रॉफ, आयेशा श्रॉफ, अभिमन्यू दासानी यांच्यासह अनेक स्टार्स मालविका राज आणि प्रणव बग्गा यांच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT