Anusha Dandekar's Ovary Surgery, Actress's Valuable Advice on Social Media to ladies SAKAL
मनोरंजन

Anusha Dandekar: अनुषा दांडेकरच्या ओवरीची शस्त्रक्रिया, सोशल मीडियावरुन अभिनेत्रीचा मोलाचा सल्ला

Anusha Dandekar Health Update लोकप्रिय व्हिडीओ जॉकी अनुषा दांडेकरने तिच्या प्रकृतीबाबत एक अपडेट दिले आहे

Devendra Jadhav

Anusha Dandekar News: लोकप्रिय व्हिडीओ जॉकी अनुषा दांडेकरने तिच्या प्रकृतीबाबत एक अपडेट दिले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. यासोबतच तिने ऑपरेशन झाल्याची माहिती दिली आहे.

तिच्या अंडाशयात गाठ होती. जी आता काढण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना आणखी अनेक गुठळ्या आढळून आल्याची माहितीही त्यांनी दिली. आजारपणातून बरं होण्याचा तिचा प्रवास अत्यंत गंभीर असल्याचे वर्णन तिने केले आहे.

(Anusha Dandekar's Ovary Surgery, Actress's Valuable Advice on Social Media to ladies)

अनुषा दांडेकरने इन्स्टाग्रामवर एक मेकअप फ्री सेल्फी शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, 'मी फक्त हॅलो म्हणण्यासाठी आले आहे. अलीकडेच, माझ्या अंडाशयावरील गाठीची शस्त्रक्रिया झाली आहे. ते पुरेसे गंभीर होते.

मी भाग्यवान आहे सर्व काही व्यवस्थित पार पडले. ही प्रक्रिया चालू असताना, आणखी अनेक गुठळ्या सापडल्या, पण मी नशीबवान होतो. सगळे ठीक आहे'.

अनुषा दांडेकरनेही यावेळी अनेक मुलींना सल्ला दिला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञाकडून नियमित तपासणी करून घ्यावी, अशी माहिती तिने दिली आहे.

ती पुढे लिहिते, मला सर्व मुलींना सांगायचे आहे. तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांना भेट देत राहा. वर्ष न चुकता स्त्रीरोग तज्ज्ञांना भेट देत राहा..

तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे लक्ष द्याल. मी 17 वर्षांची असल्यापासून हे करत आहे आणि आज मी ठीक आहे.

यावेळी अनुषा दांडेकर यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, अशी माहितीही अनुषाने दिली. तिने सर्वांचे आभार मानले. तिच्या तब्येतीच्या या अपडेटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यामध्ये रिया चक्रवर्ती, जेनिफर विंगेट अशा सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. अशाप्रकारे मोठ्या दुखण्यातून अनुषा सावरली आहे असंच म्हणावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT