Anushka sen 
मनोरंजन

Anushka sen: अभिनेत्रीने अवघ्या 21व्या वर्षी मुंबईत घेतलं आलिशान घर; फोटो शेअर करत म्हणाली...

Anushka sen: अनुष्का सेननं तिच्या मुंबईतील नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anushka sen: ड्रीम सिटी अशी ओळख असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. अनेक वर्ष कष्ट केल्यानंतर अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होते. अशातच आता अवघ्या 21 व्या वर्षी अभिनेत्री अनुष्का सेनचं (Anushka sen) मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झालं आहे. अनुष्का सेननं तिच्या मुंबईतील नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनुष्काने नवीन घराच्या आतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले.

अनुष्काने शेअर केले फोटो

अनुष्काने इंस्टाग्रामवर तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. या घराचे फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमचे नवीन घर... आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे."

अनुष्कानं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करुन नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. दिव्यांका त्रिपाठी, रित्विक किशोर आणि विशाल सिंह या सेलिब्रिटींनी अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्कानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात घराच्या चाव्या दिसत आहेत. तसेच अनुष्काचे आई-वडील देखील फोटोमध्ये दिसत आहेत.

अनुष्कानं 'या' मालिकेमध्ये केलं काम

'खतरों के खिलाडी' या शोमध्ये अनुष्कानं भाग घेतला होता. तसेच अनुष्काला बालवीर या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 'यहाँ में घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून अनुष्कानं करिअरची सुरुवात केली. तसेच तिने इंटरनेट वाला लव्ह आणि देवों के देव...महादेव या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

Latest Marathi News Live Update : केरळ, आसामसह पुद्दुचेरीत आज एकाच टप्प्यात मतदान; सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

Chhatrapati Sambhajinagar: शहरात वर्षात ९४ हजार वाहनांची भर; दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, आरटीओला ४५६ कोटींचा महसूल

Nashik: बड्या IT कंपनीत महिलेवर ५ वर्षे अत्याचार, महिलांना करायचे टार्गेट; ९ गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

Chhatrapati Sambhajinagar: वेल्डिंग दोषामुळे ३ कोटी लिटर पाणी वाया; शहरात पाणी पुरवठा दोन दिवस उशिरा

SCROLL FOR NEXT