anushka
anushka 
मनोरंजन

समाजातल्या 'त्या' गडद गोष्टींचं रहस्य उलगडणार अनुष्का शर्मा,  'पाताल लोक' वेबसिरीजचा टिझर रिलीज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा डिजीटल विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीये. भलेही ती यात अभिनय करताना दिसणार नाहीये मात्र तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एक वेबसिरीज येत आहे ज्याचं नाव आहे 'पाताल लोक'. या वेबसिरीजचा आज पहिला टिझर रिलीज करण्यात आला आहे. अनुष्काने तिच्या सोशल मिडीयावरुन हा टिझर शेअर केला आहे.

हे ही वाचा: लॉकडाऊनमध्ये सनी लिओनी बनली आर्टीस्ट.. पहा आता काय केलं..

अनुष्काने हा टिझर शेअर करत लिहीलंय, ''पाताल लोकमध्ये प्रत्येक गोष्टीची अशी एक गडद बाजू आहे आणि प्रत्येकाकडे ती लपवण्याचं रहस्य आहे.'' असं म्हणत या वेबसिरीजचा ट्रेलर ५ मे सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी रिलीज होणार असल्याचं देखील तिने सांगितलंय.. 

पाताल लोक हा टिझर पाहून लक्षात येतं की, ही सिरीज क्राईम, मिडीया, फेक न्युज आणि राजकारण यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकेल. या जगात लपलेल्या रहस्यांवरुन या सिरीजमध्ये पडदा उठवला जाणार आहे. याआधी अनुष्काने तिच्या या वेबसिरीजचं पोस्टरसुद्धा तिच्या सोशल मिडीयावर शेअर केलं होतं. 

पाताल लोक ही वेबसिरीज १५ मे २०२० ला ऍमेजॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये नीरज काबी, गुल पनाग आणि जयदीप अहलावत सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीजची पटकथा एनएच १० आणि उडता पंजाब सिनेमा लिहीलेले लेखक सुदीप शर्मा यांची आहे. 

अनुष्का शर्माने स्वतःला मोठ्या पडद्यापासून बराच काळ लांब ठेवलं आहे, अनुष्का शाहरुखसोबत २०१८ मध्ये झिरो या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिचे चाहते तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत..  

anushka sharma and amazon prime video new web series paatal lok teaser release

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT