Anushka Sharma Second Pregnancy:  esakal
मनोरंजन

Anushka-Virat Kohli: एकीकडे वर्ल्डकपचा उत्साह दुसरीकडे बाबा होण्याचा आनंद! अनुष्का - विराटच्या घरी गुडन्यूज?

Anushka Sharma Second Pregnancy: कोणी तरी येणार! अनुष्का शर्मा अन् विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई - बाबा?

Vaishali Patil

Anushka Sharma Second Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बी-टाऊनचे लोकप्रिय कपल आहे. आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी गोड बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच चाहत्यांना गोड बातमी देणार आहे. अनुष्का आणि विराट लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. अनुष्का तिची दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. अनुष्का शर्मा सध्या तीन महिन्याची प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. अनुष्का बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही कार्यक्रमात दिसली नाही. ती सार्वजनिक कार्यक्रमांपासून लांब आहे.

काही काळापूर्वी ती पती विराट कोहलीसोबत मुंबईतील एका क्लिनिकमध्ये दिसली होती. त्यावेळी अनुष्का आणि विराटने पापाराझींना फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याची विनंती केली होती.

त्याचबरोबर अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या लाइमलाइटपासूनही दूर असल्याने या अफवा पसरल्या आहेत. ही बातमी खरी असल्याच अनुष्का आणि विराट लवकरच चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेयर करतील अशी अपेक्षा दोघांचे चाहते करत आहे. सध्या दोघांनीही याबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

बऱ्याच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये या जोडप्याने मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने जानेवारी 2021 मध्ये मुलगी वामिका कोहलीचे स्वागत केले. वामिकाच्या जन्मापासून सार्वजनिक ठिकाणी दोघांनीही तिचा चेहरा दाखवलेला नाही.

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने तिच्या आगामी 'चकदा एक्सप्रेस'या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Nagpur Court: थकीत फीसाठी विद्यार्थिनीला शाळेतून काढणे बेकायदेशीर; उच्च न्यायालय, शिक्षणाचा अधिकार सर्वोच्च अधिकार असल्याचे निरीक्षण

लोकप्रिय अभिनेत्रीला मालिका सेटवर अपमानास्पद वागणूक; स्वत:च केला मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

नवरा असावा तर असा! घरातील काम करताना दिसले अविनाश नारकर, Viral Video होताच कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT