Virat Kohli's daughter Vamika's face revealed  
मनोरंजन

'ही तर मिनी विराटच'; वामिकाच्या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर 'वामिका'चीच चर्चा

स्वाती वेमूल

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वनडे सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) VVIP गॅलरीत उभ्या असलेल्या अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकाकडे (Vamika) बॅट दाखवत आनंद व्यक्त केला. यावेळी अनुष्काच्या कडेकर असलेल्या वामिकाकडे कॅमेरा वळला आणि तिची पहिली झलक सर्वांना पहायला मिळाली. विराट-अनुष्काने वामिकाचे फोटो आजवर कुठेच पोस्ट केले नव्हते. पापाराझींनाही त्यांनी कधी वामिकाचे फोटो क्लिक करू दिले नव्हते. त्यामुळे तिला पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होतीच. वामिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'ही तर मिनी विराटच' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर दिल्या आहेत. सोबतच विराटच्या लहानपणीचाही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांनी शेअर केला आहे. (Virat Kohli's daughter Vamika's face revealed)

कोहलीनं लेकीकडे पाहत खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. दुसरीकडे अनुष्का वामिकासोबत कोहलीच्या अर्धशतकाचा आनंद साजरा करताना दिसली. वामिकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिचा चेहरा समोर येऊ नये, अशी भावना विराट-अनुष्काने व्यक्त केली होती. पण कोहलीच्या अर्धशतकानंतर कॅमेरा अनुष्का-वामिकाकडे फिरला अन् पहिल्यांदाच अनुष्कासोबत वामिकाचा चेहरा सर्वांना दिसला.

वामिकाच्या व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. अनेकांनी तिच्या प्रसिद्धीची तुलना तैमुरशी केली आहे. विराट-अनुष्काने त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर वामिकाचे फोटो वेळोवेळी पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये त्यांनी कधीच तिचा चेहरा दाखवला नाही. वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तिला समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं विराटने स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीसह 5 राशींना मिळेल आदर अन् संपत्ती, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT