Anushka Sharma  esakal
मनोरंजन

Anushka Sharma : 'बाई तुझा चष्मा एवढा महाग की त्यात आमची...' अनुष्काचा काळा गॉगल चर्चेत

अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या हटक्या लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख अनुष्कानं तयार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anushka Sharma Bollywood actress share expensive sunglasses : अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या हटक्या लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख अनुष्कानं तयार केली आहे. अनुष्का नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लूक्स आणि हटक्या पोस्टसाठी चर्चेत असते. आता तर तिच्या गॉगलची चर्चा रंगली आहे. तिचा तो गॉगल इतका महाग आहे की त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला भन्नाट प्रश्न विचारले आहेत.

एकीकडे अनुष्काला तिच्या पर्सनल लाईफमध्ये कुणी दखल दिलेली आवडत नाही. मात्र दुसरीकडे ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेयर करुन चाहत्यांना प्रश्न विचारण्यास, प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले आहे. तिच्या मुलीचे वामिकाचे फोटो सोशल मीडियावर आल्यास तिचा संताप होतो. त्यावरुन तिनं कित्येकदा पापाराझ्झींवर आगपाखड केली आहे. अशा अनुष्कावर आता नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

अनुष्काच्या त्या ग़ॉगलमधील फोटोंनी नेटकऱ्यांना भन्नाट प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. मीडिया सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या गॉगलची किंमत ५२० डॉलर म्हणजेज ४१ हजार ६०० रुपये एवढी आहे.अनुष्काला साधा मेकअप करणं आवडतं. मात्र या फोटोतील तिचा अंदाज भलताच निराळा असल्याचे दिसून आले आहे.

किंग खानसोबत रब ने बना दी जोडी मधून अनुष्कानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. अनुष्काच्या चित्रपटांनी तिला स्टार बनवलं. आता ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माती झाली आहे. २०१८ मध्ये अनुष्का ही झीरोमध्ये दिसली होती. त्यानंतर आता ती बऱ्याच वर्षांनी चकदा एक्सप्रेसमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अनुष्काचा तो गॉगल पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एकानं लिहिलं आहे की, तुझ्या त्या गॉगलची किंमत ऐकून मला नवीन दुचाकी घेता आली असती असं म्हटलं आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, एवढा महाग गॉगल....सर्व सामान्य लोकांना हे असे शौक परडवणारे नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT