anushka sharma congratulate virat kohli after his 50th century in wankhede mumbai cwc 2023 semi final  Esakal
मनोरंजन

Virat Kohli Record: तू देवाचा मुलगा... 'विराट' विक्रम झाल्यावर अनुष्काने या शब्दात केलं पतीचं कौतुक

अनुष्का शर्माने विराट कोहलीचं पोस्ट करुन खास कौतुक केलंय

Devendra Jadhav

Anushka Sharma on Virat Kohli News:

काल भारताने न्युझीलंड विरुद्ध सामना जिंकून वर्ल्डकप 2023 च्या फायनलमध्ये मजल मारली. काल भारताच्या विजयात जितका वाटा मोहम्मद शमीचा आहे तितकाच वाटा विराट कोहलीचा आहे.

विराट कोहलीने काल वानखेडेवर ५० वं शतक झळकावलं आणि विक्रम केला. विराटने जेव्हा सेंच्युरी मारली तेव्हा अनुष्काने त्याला फ्लाईंग किस देत तिचा आनंद दर्शवला.

विराट कोहलीवर अनुष्काचा अभिनंदनाचा वर्षाव

विराट कोहलीने वानखेडेवर ५० वं वनडे इंटरनॅशनल शतक ठोकवल्याबद्दल अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचे कौतुक केले आणि लिहिले, ' सध्या देव सर्वोत्तम कथा लेखक आहे. तुझे प्रेम मला मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. तू दिवसेंदिवस अधिक सामर्थ्यवान बनत आहेस आणि तुला हवे ते सर्व साध्य करता येतंय हे पाहणे खूप आश्चर्यकारक आहे. तू नेहमी स्वत:शी आणि खेळाशी प्रामाणिक होतास. खरंच तू देवाचा मुलगा आहेस.'

अशा शब्दात अनुष्काने विराटचं कौतुक केलंय.

विराटचं शतक झाल्यावर अनुष्काने दिलं फ्लाईंग किस

विराटने शतक केल्यावर प्रेक्षकांना बॅट दाखवून त्यांच्या अभिवादनाचा स्विकार करत असताना अनुष्काकडे पाहिले अन् हजारो चाहत्यांनी एकच गजर केला. अनुष्काने त्याच्याकडे पाहत फ्लाईंग किसचा वर्षाव केला. त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही कौतुकास्पद आहे. विराटनं बाद झाल्यानंतर देखील अनुष्काकडे पाहत तिच्या शुभेच्छांचा स्विकार केल्याचे व्हिडिओ लक्ष वेधून घेताना दिसत आहे.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत तब्बल ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी केलेली जोरदार सुरुवात याच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली आहे. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या खेळीचाही मोठ्या धावसंख्येत मोलाचा वाटा होता. शमीने या सामन्यात ७ विकेट घेतले.

पुढे भारताने हा सामना जिंकला आता फायनलमध्ये भारत कोणाशी सामना करणार हे आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना संपल्यावर स्पष्ट होईल. रविवार १९ नोव्हेंबरला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT