anushka sharma on virat kohli century against bangladesh worldcup 2023 SAKAL
मनोरंजन

Virat Kohli Anushka Sharma: विराटचं वर्ल्डकपमध्ये पहिलं शतक आणि अनुष्काला आनंद, म्हणाली...

विराट कोहलीने काल बांग्लादेशविरुद्ध वर्ल्डकप 2023 मध्ये पहिलं शतक केलं

Devendra Jadhav

Anushka Sharma on Virat Kohli News: काल भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात विराट कोहलीने शानदार सेंच्युरी केली. विराटने ९७ रन्सवर असताना सिक्स मारुन त्याची सेंच्युरी पूर्ण केली. वर्ल्डकप २०२३ मध्ये विराटने झळकावलेलं हे पहिलं शतक.

विराटच्या प्रत्येक कामगिरीवर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्याला सपोर्ट करताना दिसते. विराटने बांग्लादेशविरुद्ध शतक झळकावल्यावर अनुष्काने त्याचं कौतुक केलंय. काय म्हणाली अनुष्का बघा.

(anushka sharma on virat kohli century against bangladesh worldcup 2023)

विराटने सेंच्युरी मारल्यावर अनुष्का म्हणाली

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीचे एक पोस्टर शेअर केले टाकले. हेच पोस्टर सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर करण्यात आले होते.

बांग्लादेश विरुद्ध चालू असलेल्या विश्वचषक 2023 सामन्यात पहिले शतक झळकावणाऱ्या विराटचे हे पोस्टर अनुष्काने शेअर केले. या पोस्टरच्या वर अनुष्काने तिचा आनंद व्यक्त करण्यासाठी लाल हृदय आणि चुंबन घेणारा इमोजी शेअर केला. अशाप्रकारे अनुष्काने तिचा आनंद साजरा केलाय.

विराटचे वर्ल्डकपमधील पहिले शतक

भारताने बांग्लादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान 42 व्या षटकात पार करत वर्ल्डकपमध्ये सलग चौथा सामना जिंकला.

भारताकडून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक ठोकले. त्याने 97 चेंडूत 103 धावा केल्या. त्याने आपले शतक षटकार मारत पूर्ण केले. शुभमन गिलने 53 धावा केल्या तर रोहितने 48 धावा करत धडाकेबाज सलामी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Spine Tail Devil Ray Fish : दुर्मीळ ‘स्पाईन टील डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी कोल्हापुरात, रिल्सवरून केलं आवाहन अन् वनविभागाची थेट कारवाई

Pune News: वाहने राज्यातच, फिटनेस परराज्याचा; आरटीओ अधिकारी-दलालांचे संगनमत, कागदोपत्री तपासणीमुळे सुरक्षा धोक्यात!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT