anushka 
मनोरंजन

कुत्र्यासोबत फोटो शेअर करुन अनुष्का शर्माने सांगितली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' सोपी ट्रिक

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नाही तर देशाची एक जागरुक नागरिक देखील आहे. ती पर्यावरण वाचवण्यापासून ते कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असते.नुकतेच अनुष्काने तिच्या सोशल मिडियावर तिचे कुत्र्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.हे फोटो ट्रेंडमध्ये तर आहेतंच मात्र यासोबतंच तिने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक जबरदस्त आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. 

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन एक पोस्ट देखील लिहिली आहे. या फोटोमध्ये अनुष्का तिच्या कपड्यांवरुन सकाळी उठल्यावरच्या लूकमध्ये दिसतेय. या पोस्टमध्ये देखील तिने तिच्या दररोज सकाळच्या रुटीन बद्दल सांगितलं आहे. अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की ती दररोज हा उपाय करते. सोबतंच सकाळी हे करत असताना तिचा कुत्रा देखील तिच्यासोबत असतो. 'ऑईल पुलिंग'चा हा उपाय आहे. याला 'गंडुशा' देखील म्हटलं जातं.

अनुष्काने हा उपाय कसा करायचा हे देखील सांगितलं आहे. तसंच त्याचा होणार फायदाही तिने शेअर केला आहे. तिने लिहिलंय, 'ही एक डेंटल टेक्निक आहे. हे सकाळी उपाशी पोटी करायचं असतं. यात सकाळी उठल्यावर उपाशी पोटी तोंडामध्ये थोडंसं तेल घेऊन चुळ भरतो तसं करायचं आहे. थोडावेळ तोंडामध्ये तसं केल्यानंतर मग हे थुकून टाकायचं आहे.'

याच्या फायद्याबद्दल सांगताना अनुष्काने लिहिलंय, 'दातांच्या स्वच्छतेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी हे उत्तम असतं. सोबतंच हे शरिरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढायला मदत करतं.' अनुष्का लिहिते की, 'सध्या आपण आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेत आहोत. सोबतंच शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर लक्ष देत आहोत. म्हणून विचार केला की हे तुमच्यासोबतंही शेअर करावं. आशा करते की यामुळे तुम्हाला देखील फायदा होईल.'

अनुष्काचे कुत्र्यासोबतचं फोटो, तिचं सकाळचं रुटीन आणि तिने सांंगितलेले हे उपाय सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.   

anushka sharma shares oil pulling technique with fans for immunity  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT